सिडको एन १२ च्या गार्डनमध्ये जुगाऱ्यांचा रंगतोय डाव!; शहर गुन्हे शाखेने पकडले २ जुगारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर गुन्हे शाखेने एन १२  सिडको मधील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये जुगार खेळणाऱ्या दोघांना बुधवारी (१० नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेसहाला पकडले. त्यांच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद अफसर सय्यद नुर (वय ६२, रा. बिस्मिल्ला कॉलनी, घाटी परिसर)  व ईलीयास खान साहेबखान पठाण (वय ४५, रा. अली किराणा दुकानाजवळ, सईदा कॉलनी, जटवाडा रोड) अशी पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार अमोल शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहाला शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम, सहायक फौजदार मोदी, पोलीस अंमलदार गायकवाड आणि अमोल शिंदे हे टीव्ही सेंटर भागात गस्त घालत होते. त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, स्वामी विवेकानंद गार्डन एन १२  सिडको येथे काही जण जुगार खेळत आहेत. पथकाने लगेचच तिथे धाव घेतली. तिथे सय्यद अफसर व इलियास खान हे तिर्रट नावाचा जुगार पैशांवर खेळत होते. त्यांना पोलिसांनी जागीच पकडले. त्यांच्या ताब्यातून एकूण ११ हजार ६५० रुपये जप्त केले. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नजीर तडवी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software