छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनिअर तरुणीला थायलंडमध्ये विकले! 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनिअर तरुणीला थायलंडला नोकरीच्या आमिषाने नेत विकण्यात आले. कंपनी मालकानेच हे कृत्य केले. तरुणी भारतीय दूतावासाच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेत मायदेशी परतली आहे. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी तिचा कंपनी मालक अविनाश रामभाऊ उढाण याच्याविरुद्ध सोमवारी (२७ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

२९ वर्षीय तरुणी इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे. २०२० मध्ये तिचा घटस्फोट झालेला आहे. २०२१ मध्ये ती छत्रपती संभाजीनगर शहरात नोकरीसाठी आली होती. लेडीज होस्टेलमध्ये राहत होती. २०२५ मध्ये उल्कानगरीच्या शंकरा रेसिडेन्सीतील एफ व्होल्ट कंपनीत तिला नोकरी लागली. काम करताना कंपनीमालक अविनाश उढाणने तिला थायलंड येथे मार्केटिंग मॅनेजरची चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे सांगितले. या जॉबसाठी त्याने तिच्याकडून दीड लाख रुपये घेतले. जॉब कन्फर्म झाल्याचे सांगून गेल्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिला थायलंडला जाण्यासाठी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेऊन सोडले. तेथून ती बँकॉकला गेली. तेथे हरप्रित सिंग नावाचा व्यक्ती तिला घ्यायला आला. त्याने तिला कम्पोट (कम्बोडिया) येथील क्रिएटिव्ह माइंडसेट या कंपनीत टॅक्सीने नेऊन सोडले.

या कंपनीत तरुणीकडून स्कॅमिंगचे काम करून घेतले जाऊ लागले. उढाणने आपल्याला याच कामासाठी थायलंडला पाठवल्याचे आणि विकल्याचे तिला कळल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने दोन महिन्यांनी क्रिएटिव्ह माइंडसेट या कंपनीला २ हजार अमेरिकन डॉलर भरून स्वतःची सुटका करून घेतली आणि कम्बोडिया येथील भारतीय दूतावासाच्या मदतीने ती २१ ऑक्टोबरला मुंबईत परतली. अविनाश उढाण याने तिला स्कॅमिंगच्या कामाची पूर्वकल्पना न देता थायलंडला पाठवले आणि चक्क कंपनीला विकल्याने तरुणीने आधी मुंबईतील सहारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. हा गुन्हा सहारा पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसांकडे वर्ग केला. मात्र घटना जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तिकडे गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software