छ. संभाजीनगर शहर पोलिसांचा धिंड पॅटर्न : ड्रग्‍ज तस्करांना पुन्हा बेड्या घालून मिरवले, पण यावेळी सोबत काठीचे फटकेही... गुन्हेगार पार कमरेतून वाकले... हात जोडत लोकांना म्हणाले, आम्ही चुकलो, तुम्ही चुकू नका...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा गुन्हेगारांची धिंड काढण्याचा पॅटर्न सध्या राज्‍यभर गाजत आहे. नागरिकांत दहशत माजवणारे अट्टल गुन्हेगार, ड्रग्‍ज तस्करांची धिंड काढून हात जोडत, विनंत्या करताना मिरवले जात आहे. त्यामुळे या गैरमार्गाला जाणाऱ्यांत धडकी भरत आहे. आदल्या दिवशी जिन्सी परिसरातून धिंड काढलेल्या तस्करांची शुक्रवारी (५ सप्टेंबर) पाठ, पायांवर लाठीचे फटके देत नारेगावातील बलुच गल्ली, आझाद चौक, सिटी चौक, बुढीलाईनमधून दुपारी १ ते ३ पुन्हा धिंड काढण्यात आली.

मुकुंदवाडी पोलिसांनी पकडलेले मोहंमद मुज्जमील मोहंमद नजीर (वय ३४), लोमान ऊर्फ नोमान खान इरफान खान (वय २१, दोघेही रा. रहेमानिया कॉलनी), मोहंमद लईखुद्दीन मोहंमद मिराजोद्दीन (वय २५, रा. रहीमनगर), शेख रेहान शेख अशपाक (वय १९, रा. कटकट गेट) आणि सिटी चौक पोलिसांनी पकडलेला शेख आमिर शेख सलीम (वय ३५, रा. रशीदपुरा) या पाचही ड्रग्ज तस्करांची अशी धिंड काढून पोलिसांनी पार नाचक्की केली. अंमली पदार्थ विरोधी पथक, सिटी चौक आणि मुकुंदवाडी पोलिसांच्या वतीने या धिंड मिरवणुकीचे आयोजन केले होते. शेख आमेरला बुढीलेन परिसरातही मिरवले.

गुन्हेगार कमरेतून वाकले...
धिंड काढताना पोलीस लाठीचे फटके देत असल्याने गुन्हेगार पार कमरेतून वाकले होते. हात जोडून आम्ही चुकलो, तुम्ही चुकू नका, अशी विनंती नागरिकांना करत होते. नारेगावातील बलुच गल्लीत मोठ्या प्रमाणावर ड्रग्‍ज तस्कर राहतात. त्यांची मुलेही तस्करीत लिप्त आहेत. कुटुंबातील महिलांनाही यासाठी पुढे केले जाते. कारवाईसाठी पोलीस गेले की हल्ले करतात. त्‍यामुळे पोलिसांनी ड्रग्‍ज तस्करांना बलुच गल्लीतही मिरवले. ते पाहून ओट्यावर बसलेली लेडी डॉन पटकन घरात पळाल्याचे दिसून आले.

WhatsAppImage2025-09-05at5.27.42PM1यापूर्वी १३ ऑगस्टला मैत्रिणीवर गोळ्या झाडणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा एजाज (वय २७, रा. किलेअर्क) याची धिंड काढली होती. त्यानंतर २० ऑगस्टला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दोघांवर चाकूचे वार करून गंभीर जखमी करणाऱ्या हर्षल गणेश मुळे (वय ३६, सिडको एन ९) याची सिडको पोलिसांनी टीव्ही सेंटर परिसरात हातकड्यांसह धिंड काढली होती. त्यानंतर १, ४ आणि ५ सप्‍टेंबरला ड्रग्‍ज तस्करांची धिंड काढण्यात आली. त्यामुळे शहर पोलिसांचा हा धिंड पॅटर्न राज्‍यभर चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे तेजाची धिंड काढल्यानंतर या कारवाईला सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने धिंड पॅटर्न संबोधले होते. तोच शब्द आता या कारवाईसाठी राज्‍यभर चर्चेत आला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?

Latest News

Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल? Adhyatm : शारदीय नवरात्रात माँ दुर्गेचे कोणत्या वाहनाने आगमन अन्‌ प्रस्थान होईल?, त्याचा काय परिणाम होईल?
लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. २२ सप्टेंबरपासून माँ दुर्गा तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. माँ दुर्गेच्या या दिवसांमध्ये,...
Special interview : अभिनेत्री वाणी कपूरने दिला कानमंत्र; धीर ही अशी किल्ली, जी प्रत्येकाच्या नशिबाचे कुलूप उघडू शकते!
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्‍यू
मोठी बातमी : हर्सूल जेलमध्ये ५ कैद्यांचा राडा!; तुरुंगाधिकाऱ्यांना मारहाण, इतके आक्रमक झाले की कर्मचाऱ्यांनाही ऐकत नव्हते..., नक्की काय अन्‌ कशामुळे घडलं जाणून घ्या...
वेळेत पोलिसांची गाडी आल्याने कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांची लूट टळली!; तिघांना अटक, धूत हॉस्पिटलसमोरील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software