मध्यवर्ती बसस्थानकावर पुन्हा राडा; प्रवाशाने बस कंडक्‍टरला केली बेदम मारहाण!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मध्यवर्ती बसस्थानकावर पुन्हा राडा झाला. बस परत जाणार नसल्याचे सांगितल्याने एका प्रवाशाने वाहकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (१९ ऑक्‍टोबर) रात्री पावणेआठला घडली. क्रांती चौक पोलिसांनी या प्रकरणात आज, २० ऑक्‍टोबरला प्रवाशी व त्‍याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एसटी वाहक अनिकेत दीपक रायते (वय २४, रा. न्याहळोद, ता. जि. धुळे) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. सुमारे ४ वर्षांपासून दोंडाईचा बस डेपोत कर्तव्यावर आहेत. रविवारी (१९ ऑक्‍टोबर) त्यांची ड्युटी दोंडाईचा-छत्रपती संभाजीनगर बसवर (क्र. एमएच १४, एलएक्स ६६५२) होती. दुपारी १२ ला बस छत्रपती संभाजीनगरसाठी निघाली. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकावर रात्री पावणेआठला आली. बसमधील प्रवाशी उतरवत असताना ॲड. शकील अहेमद इकबाल आहेमद मोमीन (वय ६४, रा. नारळी बाग, छत्रपती संभाजीनगर) यांना वाहक रायते यांनी सांगितले, की गाडी प्रवाशी नसल्यामुळे परत जाणार नाही. त्यावर त्यांनी शिवीगाळ केली व तुमच्या काय बापाची गाडी आहे काय? अशी दमदाटी केली. ही बाब सांगण्यासाठी रायते हे कंट्रोल पॉइंटकडे निघाले असता मागे येऊन शकील च त्यांचा तरुण मुलगा, वय अंदाजे ३० (नाव माहीत नाही) यांनी रायते यांची कॉलर पकडत शिवीगाळ करत मारहाण केली. तुला पाहून घेईन, अशी धमकी दिली. रायते यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी ॲड. शकील आणि त्‍यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software