शिवशंकर कॉलनीत व्यापाऱ्याचे घर फोडले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शिवशंकर कॉलनी परिसरातील नाथनगरात मंगळवारी (२३ डिसेंबर) सकाळी ७ च्या सुमारास समोर आली. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

व्यापारी गणेश गोपाल बसैये (वय ४३, रा. शिवशंकर कॉलनी नाथनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते बर्फ गोळा, सॅन्डविच विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे तीन मजली घर आहे. खालच्या रूममध्ये स्वयंपाक, जेवण करून वरच्या रूममध्ये कुटुंब झोपते. मंगळवारी (२३ डिसेंबर) सकाळी ७ च्या सुमारास त्यांना खालच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला. कपाटामधील कपडे अस्ताव्यस्त होते. दोन स्टीलचे डब्बे पडलेले दिसले. त्यातील चांदीच्या वस्तू व रोख रक्कम दिसून आली नाही. चोरट्यांनी २ हजारांचे स्मार्ट वॉच, १२ हजारांचे चांदीचे चैन, ५ हजारांची सोन्याची अंगठी, ३ हजारांचा चांदीचा शिक्का, १५ हजार रुपये रोख चोरट्याने चोरून नेल्याचे दिसले. अधिक तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय वानखेडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software