विष्णूनगरमध्ये मोठी घरफोडी, साडेआठ लाखांचे दागिने लंपास

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जवाहरनगर परिसरातील विष्णूनगरमध्ये वृद्धा गावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांचे घर फोडून साडेआठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (१२ नोव्हेंबर) रात्रीतून घडली. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वृद्धेचे नातू नितीन फरकाडे (वय ३९) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांची आजी तुळसाबाई काळे विष्णूनगरमध्ये एकट्या राहतात.  त्या बुधवारी दुपारी गावी गेल्या. चोरट्यांनी रात्रीतून घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरी केली. गुरुवारी सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तुळसाबाई काळे यांना कळवले. तुळसाबाई यांनी नितीन यांना घरी जाऊन पाहायला सांगितले. घरातील लोखंडी कपाट उघडे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त होते. तुळसाबाई या गावाहून घरी आल्या. त्यांनी चोरी गेलेल्या दागिन्यांची खात्री करून जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले. साडेपाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, दोन तोळ्यांचे मिनी गंठण आणि ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या चोरीला गेल्या आहेत. दागिन्यांचे बाजारमूल्य अंदाजे साडेआठ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास जवाहरनगर पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...

Latest News

प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही... प्रा. राजाराम लोंढे खून प्रकरण : रीलस्टार तरुणीचेही प्रा. लोंढेंसोबत २५ लाखांचे व्यवहार!; व्यवहारांचे बाँडवर करारनामेही...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक...
वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software