एकतर्फी प्रेमातून विवाहितेचे जगणे केले अवघड, २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल, वाळूज MIDC तील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  एकतर्फी प्रेमातून २३ वर्षीय तरुणाने विवाहित तरुणीचे जगणे अवघड केले. वारंवार पाठलाग केल्यानंतर शनिवारी (३ जानेवारी) दपारी तो थेट तिच्या घरात घुसला आणि अश्लील चाळे केले. त्याचवेळी घरी आलेल्या तिच्या पतीलाही त्याने धमक्या दिल्या. घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचेही दगड मारून नुकसान केले. ही घटना वाळूज एमआयडीसीतील कमळापूर रोड भागात घडली.

करण विठ्ठल सागळे (वय २३, रा. मातोश्री विहार, कमळापूर रोड) असे संशयित तरुणाचे नाव आहे. शनिवारी दुपारी विवाहित तरुणी मुलीसह घरात असताना करण तिच्या घरासमोरील बंद घराच्या छतावर बसला आणि माझ्याशी बोलली नाहीस तर फाशी घेईन, अशी धमकी तिला देऊ लागला. तिच्या घरात जबरदस्ती घुसून तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला. त्याचवेळी महिलेचा पती कामावरून घरी आला.

त्याने जाब विचारला असता त्यालाही करणने शिवीगाळ करत मारहाण केली आणि खुनाची धमकी दिली. पळताना घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे दगड मारून नुकसान केले. घरासमोर उभ्या मोटारसायकलीला लाथ मारून नुकसान केले. यापूर्वीही विवाहित तरुणी मुलीला शाळेत सोडायला जात असताना तिचा पाठलाग करत करण बोलण्याचा आग्रह धरत होता. विवाहितेच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी करणविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...

Latest News

माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले... माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड शहरातील माऊलीनगर भागातील गव्हाच्या शेतात मंगळवारी (३ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास क्रूर मातेने...
कावीळ सदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना
महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software