१७ वर्षीय मुलीचा मोबाइल स्विच्ड ऑफ येताच वडील शाळेत धावले, फूस लावून कुणीतरी पळवले!, किराडपुऱ्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post


छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुऱ्यातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ती लहान बहिणीची टीसी घेण्यासाठी फातेमा गर्ल्स हायस्कूलला आली होती. त्यानंतर गायब झाली आहे. ही घटना शनिवारी (११ ऑक्‍टोबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी चौक पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध सोमवारी (१३ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे. मुलगी नारेगावमध्ये वडील, आई, बहिणीसह राहते. लहान बहिणीची टीसी घेण्यासाठी वडिलांनी तिला शाळेत सोडले होते. घरात फरशी बसविण्याचे काम चालू असल्याने ते घरी आले.

सकाळी साडेअकराला मुलीला कॉल केला असता तिने शाळेत मीटिंग सुरू असल्याने टीसी मिळण्यास उशीर होत असल्याचे सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा तिला वडिलांनी कॉल केला असता मोबाइल बंद येत होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी तातडीने किराडपुरा परिसर व फातेमा गर्ल्स हायस्कूलकडे धाव घेतली. मात्र मुलगी मिळून आली नाही. तिचा आजूबाजूच्या परिसरात, नातेवाइक, बसस्थानकावरही शोध घेण्यात आला. अखेर तिला कुणीतरी फूस लावून पळवल्याची खात्री झाल्याने तिच्या वडिलांनी जिन्सी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलगी १० वी शिकलेली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गजानन मांटे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...

Latest News

महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य... महापालिकेत स्थायी समितीत १६ सदस्यांची निवड, भाजपचा वरचष्मा, हे आहेत नवे सदस्य...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडण्यासाठी आज, ५ मार्चला सकाळी ११ ला विशेष सर्वसाधारण सभा...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
कर्जबाजारी शेतकऱ्याने ठिबक सिंचनच्या नळीने घेतला गळफास!, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software