राँग साइड आलेल्या जोडप्याचा पोलिसावर हल्ला!; शिवीगाळ करत महिलेने लगावला ‘फटका’!!, मील कॉर्नर चौकात काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दुचाकीने राँग साइड आलेल्या जोडप्याला अडवणे वाहतूक पोलिसांना चांगलेच महागात पडले. दुचाकीस्वार पुरुषाने अंगावर धावून येत अर्वाच्‍च भाषेत शिवीगाळ केली, तर महिलेनेही शिवीगाळ करत हाताला असा फटका मारला, की पोलीस अंमलदारांच्या हातातील डिव्हाइस खाली पडून फुटले. ही घटना मील कॉर्नर चौकात शुक्रवारी (१४ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. क्रांती चौक पोलिसांनी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सोमनाथ बाबुराव जाधव (वय ५३) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शुक्रवारी मिलकॉर्नर वाहतूक सिग्नलवर त्यांची ड्युटी होती. सोबत वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार मडावी, महिला पोलीस अंमलदार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शिखरे होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका दुचाकीवरून (MH 20 GB 9249) महिला, पुरुष बारापुल्ला गेटच्या दिशेकडून विरुद्ध बाजूने मिलकॉर्नर चौकाकडे येत होते. त्यामुळे सोमनाथ जाधव यांनी चलान देण्यासाठी डिव्हाईस मशिनमध्ये त्या दुचाकीसह चालकाचा फोटो घेतला. ते पाहून दुचाकीचालकाने दुचाकी रस्त्यातच थांबवली व आडवी लावली.

जाधव यांनी त्याला दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले असता त्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला न घेता सोबत मोठमोठ्याने बोलून हातवारे करून वाद घालून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागला. त्याचवेळी दुचाकीचालकासोबत मागे बसून आलेली महिलाही जाधव यांच्यासोबत मोठमोठ्याने बोलून हातवारे करून वाद घालू लागली. जाधव हे त्यांना समजावत असताना ती महिला अचानक जाधव यांच्या अंगावर धावून आली. तिने डिव्हाईस मशिन असलेल्या हाताला तिच्या हाताने जोरात फटका मारून मशिन खाली पाडले. त्यामुळे मशिन फुटून नुकसान झाले. त्यानंतर दुचाकीचालक व त्याच्यासोबतची महिला दुचाकीवर बसून त्या ठिकाणावरून निघून गेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खांड्रे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software