विदेशात नोकरीला पाठविण्याच्या आमिषाने दोन उच्‍चशिक्षित तरुणांना भामट्याने गंडवले!; सुरुवातीला पोलिसांची कारवाईस चालढकल; न्यायालयाच्या दट्ट्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून भामट्याला केली अटक!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एका भामट्याने जॉब प्लेसमेंट कंपनी उघडून तरुणाला गंडवायचे काम सुरू केले. त्‍याने दोन अभियंत्‍यांना नोकरीसाठी रोमानिया देशात पाठविण्याचे आमिष दाखवून ४ लाख ३० हजार रुपये घेतले. पण नंतर उलटला. अभियंत्‍यांनी सिडको पोलिसांत धाव घेतली असता पोलिसांनी कारवाईस टाळाटाळ केली. त्‍यामुळे अभियंत्‍यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पोलिसांना दट्ट्या देताच तातडीने गुन्हा दाखल करून पोलिसांनी भामट्याला अटक केली आहे.

अक्षय रामलू कल्याण (रा. ए. आर. के. ॲबरोड जॉब प्लेसमेंट प्रा.लि. आंबेडकर चौक पाण्याचे टाकीजवळ, एन-७, सिडको, छ. संभाजीनगर) असे या भामट्याचे नाव असून, त्‍याने अशाप्रकारे अनेकांना गंडा घातला असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विपिन निळकंठराव लेकूरवाळे (वय ३२, रा. सारा परिवर्तन, सावंगी हर्सूल, मूळ रा. नेरकरपुरा, ता. वरूड, जि. अमरावती) व सचिन नारायण मांगे (रा. गोंडखैरी जि. नागपूर) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. विपिन यांनी तक्रार दिली, की ते शेंद्रा एमआयडीसीतील पर्किन्स इंडीया प्रा. लि. कंपनीत नोकरी करतात. त्यांनी इंजिनियरींग शाखेतून डिप्लोमाची पदवी घेतली आहे.

ते व त्यांचा मित्र सचिन नारायण मांगे (रा. गोंडखैरी जि. नागपूर) नोकरीच्या शोधात होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांना ए. आर. के. ॲबरोड जॉब प्लेसमेंट प्रा. लि. (पत्ता : आंबेडकर चौक पाण्याच्या टाकीजवळ, एन-७, सिडको, छत्रपती संभाजीनगर) हे सुशिक्षित तरुणांना नोकरीसाठी युरोपीयन देशात पाठवत असल्याचे माहीत झाले होते. त्यानंतर विपीन व सचिन हे अक्षय कल्याण याला जाऊन भेटले. त्याने दोघांना रोमानिया या देशात मॅकेनिकल इंजिनियर म्हणून पाठवून देईल, असे सांगितले. त्यासाठी ३ लाख रुपये शुल्क मागितले. टप्प्याटप्प्याने पैसे देण्याची तयारी दोघांनी केली. ८ एप्रिलला विपीन व सचिन यांनी रोमानिया देशात जाण्यासाठी अक्षयसोबत बाँडवर लेखी करारनामा केला.

त्यात रोमानिया या देशात दोघांना नोकरीसाठी मॅकॅनिकल इंजिनियर म्हणून पाठवत असून त्यासाठी प्रत्येकी ३ लाख रुपये लागतील, असे नमूद करण्यात आले. त्यानंतर विपीनने फोन पेद्वारे अक्षयला १ लाख ६५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर अक्षयने दुसरा फोन पे नंबर दिला. हा माझ्या बायकोचा नंबर आहे. त्यावर पैसे पाठवा, असे सांगितले. त्‍यावर विपीन यांनी ५० हजार रुपये पाठवले. सचिन मांगे यांनीदेखील अक्षयला २ लाख १५ हजार रुपये पाठवले. दोघांनी मिळून ४ लाख ३० हजार रुपये अक्षयला दिले होते. त्यानंतर अक्षयच्या मिसारवाडीतील ऑफीसला जाऊन विपीन व सचिन यांनी आम्हाला रोमानियाला नोकरीसाठी कधी पाठवणार, याबाबत विचारपूस केली. त्यावर त्याने व त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा करत राहिले. बरेचवेळा फोनवर व प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा घेतला असता अक्षय कल्याण याने दोघांना सांगितले की, तुम्हाला रोमानिया देशात पाठविले जाणार नाही.

तुम्हाला मालदिव देशात स्टुडंट व्हिजावर जावे लागेल असे सांगितले. त्यावर विपीन आणि सचिन त्याला म्हणाले, की आम्ही तुला रोमानिया देशात नोकरीकरिता पाठविण्यासाठी पैसे दिले व तसा आपल्यात करारनामा सुध्दा झालेला आहे. आम्ही मालदिव देशात जाण्यासाठी तयार नाही. त्यानंतरही बरेच दिवस अक्षय उडवाउडवीची उत्तरे देत राहिला. एकेदिवशी विपीन व सचिन हे त्याच्या ऑफिसवर गेले. आम्हाला नोकरीसाठी रोमानिया या देशात पाठवा नाहीतर आम्ही दोघांनी मिळून दिलेले एकूण ४ लाख ३० हजार रुपये परत कर, असे सांगितले. त्यावर अक्षयने तुम्हाला काय करायचे ते करा. मी तुम्हाला रोमानिया या देशात पाठविणार नाहीच. पैसेदेखील परत देणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने त्याचे ऑफिसदेखील बंद करून पसार झाला.

न्यायालयाने आदेश देताच पोलीस कामाला लागले...
एवढी मोठी फसवणूक होऊनही आणि पुरावे देऊनही या प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याने दोन्ही अभियंत्‍यांनी न्यायालयात धाव घेतली. त्‍यानंतर न्यायालयाने या प्रकरणात कारवाईचा आदेश पोलिसांना दिला. त्‍यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत अक्षयला अटक केली. त्‍याला मंगळवारी (२३ सप्‍टेंबर) न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी न्‍यायालयाने सुनावली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!

Latest News

वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ! वाळूज MIDC तील बंद कंपनीत शेकडो घरगुती गॅस सिलिंडर्सचा साठा आढळल्याने खळबळ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...
सिल्लोडच्या सुसाट पिकअप वाहनाने स्कुटीस्वार डॉक्टरांना उडवले, जागीच मृत्यू, पालोदवर शोककळा!!
कांचनवाडीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या युवकावर पोलिसांनी घातली झडप!, व्हॉट्‌स ॲप चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक उलगडा...
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software