छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ अपघात, २ ठार, ३ जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात ४ आणि गंगापूरला १ असे एकूण ५ अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला असून, ३ जण जखमी झाले आहेत. सिडको, नागेश्वरवाडी, नक्षत्रवाडी, बीड बायपास आणि गंगापूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावर हे अपघात घडले.

दुचाकीस्वाराला ट्रकने उडवले
गंगापूरजवळ छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शुक्रवारी (२१ नोव्‍हेंबर) दुपारी साडेचारला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार अनिल कचरू पारखे (वय ४०, रा. वाहेगाव, ता. गंगापूर, ह. मु. वाळूज) यांचा मृत्यू झाला. ते वाळूजला येत होते. एका हॉटेलसमोर त्यांना ट्रकने उडवले. आधी गंगापूरचे उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री ८ ला त्यांचा मृत्यू झाला. त्‍यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्‍यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, पोलीस अंमलदार अमित पाटील ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.

दोन दुचाकींच्या धडकेत प्राध्यापकाचा मृत्यू
दोन दुचाकींची धडक देऊन प्रा. हेमंत शिवलाल पवार (वय ४५, रा. गिरनेर तांडा, ह. मु. इटखेडा, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील नक्षत्रवाडीजवळ शुक्रवारी (२१ नोव्‍हेंबर) सकाळी साडेनऊला घडली. पवार हे निलजगाव (ता. पैठण) येथील लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापक होते. नेहमीप्रमाणे विद्यालयात दुचाकीने जात होते. नक्षत्रवाडीजवळ त्‍यांची धडक समोरून येणाऱ्या दुचाकीशी झाली. यात समोरच्या दुचाकीवरील दोघे आणि प्रा. पवार जखमी झाले. तिघांना नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

नागेश्वरवाडीत सुसाट कारने घडवला थरार
सुसाट कारवरील (क्र. एमएच २० ई ७०११  चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कारने रिक्षा आणि मोपेडला उडवले. यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले, तर मोपेडस्वार गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलवले. ही घटना निराला बाजार येथून नागेश्वरवाडीकडे येणाऱ्या रोडवर शनिवारी (२२ नोव्‍हेंबर) सकाळी ११ च्या सुमारास घडली. धडक इतकी जबर होती, की कारच्या एअरबॅग उघडल्या. क्रांती चौक पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले. त्याचीही प्रकृती बिघडल्याने घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातामुळे रस्‍त्‍यावर वाहतूक कोंडी झाली होती. 

भरधाव कारने दुचाकीस्वार कुटुंबाला उडवले...
पत्‍नी, मुलीसह जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव कारने उडवल्याची घटना बीड बायपासवरील गुडलक हॉटेलसमोर बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेसातला घडली. मोहम्मद अजहर (वय ३५, रा. हुसेननगर, बीड बायपास) यांच्यासह त्‍यांची पत्‍नी व मुलगी जखमी झाले आहेत. अजहर यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिसांनी कारचालक सुमेर सिकंदर शहा (वय २१, रा. लासूरस्टेशन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

सिडको चौकात दुचाकीला धडक देऊन हायवा पसार
सुसाट हायवाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार आदित्य महेंद्र जोगदंड (वय २३, रा. बिडी कामगार वसाहत, काबरानगर) हा जखमी झाला. ही घटना शनिवारी  सिडको बसस्थानक सिग्नलजवळ १५ नोव्‍हेंबरला सायंकाळी सातला घडली. सिडको पोलिसांनी हायवा (क्र. एमएच २० एचएफ ५५५३) चालकाविरुद्ध शुक्रवारी (२१ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. आदित्य हा हर्सूल येथील असद हॉस्पिटलमध्ये स्टाफ ब्रदर म्हणून काम करतो. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याचा जबाब सिडको पोलिसांनी नोंदवला. त्याला धडक दिल्यानंतर हायवाचालक वाहन घेऊन सुसाट निघून गेल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लग्नात सोन्याची अंगठी व लॉकेट दिले नाही म्हणून ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक...
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
वरूडकाजीमध्ये चिकलठाणा पोलिसांची मोठी कामगिरी :  गोवंशाची हत्या सुरू असतानाच छापा, दोघांना पकडले, दुसऱ्या ठिकाणावरून ३ गोवंश वाचवले!
‘घाटी’त बोगस नियुक्तपत्र घेऊन आला, पदोन्नतीच्या पदाचा सरळ सेवा भरती आदेश पाहून अधिकारी चक्रावले, बिंग फुटले!, छत्रपती संभाजीनगरमध्ये युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software