खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घराबाहेर जाताना खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणाऱ्यांची कमी नाही. मात्र ही बाब चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहे. ७ मार्चलाच सुराणानगरात चप्पल ठेवण्याच्या रॅकमध्ये चावी ठेवून ड्युटीला गेलेल्या डॉक्टरच्या १ लाख ८० हजार रुपयांच्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यानंतर आता सिडको एन ६ मध्ये एका विद्यार्थ्याच्या खिडकीत ठेवलेली चावी घेऊन चोरट्याने लॅपटॉप चोरून नेला. ही घटना शनिवारी (१४ मार्च) सायंकाळी साडेपाचला समोर आली. सिडको पोलिसांनी चोरट्याविरुद्ध मंगळवारी (१७ मार्च) गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार विष्णू बरकुले (वय २०, रा. अंबाभवानीनगर खानापूर फाटा वसमत रोड परभणी ह. मु. एन ६ सिडको साईनगर, छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो ३ महिन्यांपासून दोन मुलांसोबत रूम करून राहतो. एमजीएम येथे बी.एस्सी.आय.टी.चे शिक्षण घेतो. शिक्षणासाठी त्याने २०२५ मध्ये असूस कंपनीचा लॅपटॉप घेतला आहे. शनिवारी (१४ मार्च) दुपारी तीनच्या सुमारास ओंकार व त्यांचा रूम पार्टनर ऋषिकेश देविदास मालुदे (रा. फुलंब्री) हे रूमला लॉक लावून त्याची चावी शेजारी खिडकीत दिसणार नाही, अशी ठेवून ऋषिकेशच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी हर्सूल येथे गेले होते. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास ते परत रूमवर आले. त्यावेळी त्याला लॅपटॉप ठेवलेल्या जागी दिसून आला नाही. चोरट्याने खिडकीत ठेवलेल्या चावीने दार उघडून २५ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेल्याचे दिसले. ओंकारने सिडको पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुभाष शेवाळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी

Latest News

ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) :  छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी येथील गट क्रमांक ३० मधील ५४ एकर ३१ आर जमिनीच्या...
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
खिडक्या, शू रॅकमध्ये चाव्या ठेवणे करा बंद, वाढताहेत चोऱ्या, जाताहेत मौल्यवान वस्तू, आता सिडको एन ६ मध्ये चोरी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software