मैत्रिणीशी बोलतो म्हणून १८ वर्षीय तरुणावर बंदूक रोखली!; सलीम अली सरोवरजवळील थरार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मैत्रिणीशी बोलण्याच्या संशयावरून १८ वर्षीय तरुणावर ३ तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर एका हल्लेखोराने थेट पिस्तुल रोखत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) सायंकाळी पावणेसहाला सलीम अली सरोवरमागे डिलक्स बेकरीच्या कन्स्ट्रक्शन साईटवर घडली.

पोलिसांनी हल्लेखोर शेख मुजमिल ताहेर शेख (वय १८) याला अटक केली असून, त्याचे सोहेल आणि अरमान सय्यद नावाचे साथीदार फरारी आहेत. हल्ला झालेला तरुण आणि हल्ला करणारे तरुण सर्व जण उच्‍चभ्रू कुटुंबातील आहेत. मुजमिलचे वडील कंत्राटदार आहेत. सोहेलचे वडील भंगार व्यावसायिक आहेत. मुजमिलला न्यायालयात हजर केले असता १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शहवेज आयान जैदी (वय १८, रा. मॉडल हौसिंग सोसायटी हिमायतबाग, दिल्लीगेट) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तो सिल्लोडच्या नॅशनलमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकतो. सलीम अली सरोवरमागे डिलक्स बेकरीच्या कन्स्ट्रक्शन साईटवर शहवेज व त्याचे मित्र सॅवियो फर्नांडिस, अफान सय्यद, मोईस बागवान, जैद शेख, रैयान असे बोलत उभे होते. त्याचवेळी पांढरी फाँर्चुनर गाडी (MH 12 UC 7545) त्यांच्याजवळ येऊन थांबली. गाडीतून सोहेल, शेख मुजमिल, अरमान सय्यद उतरले. शेख मुजमिल याने बाजूला घेऊन शहवेजला, ‘तुने मेरी फ्रेंडस से बात क्यो की’ असा जाब विचारला. त्यावर शहवेजने त्याला "मैने उसका मोबाईल नंबर ब्लॉक किया’, असे सांगितले.

तरीही मुजमिलने फॉर्चुनर गाडीकडे जाऊन डिक्कीतून लोखंडी रॉड आणला आणि रॉडने शहवेजच्या तोंडावर मारले. अरमान सय्यद याने बरगडीत हाताने ठोसे मारले. त्यांच्यासोबत आलेल्या सोहेलने शहवेजवर पिस्तुल रोखली. "आज तुझे खतम कर दूँगा’, अशी धमकी दिली. त्यांच्या ताब्यातून सुटून शहवेजने पळ काढला. पिस्तुल पाहून त्याचे मित्रही पळाले. शहवेज SBH कॉलनीतील एका पार्किंगमध्ये लपून बसला व त्याच्या वडिलांना कॉल करून कळवले. त्याचा मित्र मोईस त्याला घ्यायला आला. त्याच्यासोबत शहवेज रोजेबाग येथील फंक्शन हॉलला आला. तिथे त्याचे वडीलही आले. त्यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस!

Latest News

मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस! मस्तच... इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून ४ दिवस!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इंडिगो विमान कंपनीने ‘समर शेड्यूल'मध्ये छत्रपती संभाजीनगर-बंगळुरू विमानसेवा आता आठवड्यातून चार दिवस केली आहे....
छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा भगवान महावीर जयंती ठरणार आदर्शदायी : ३१ मार्चला भव्य डीजेमुक्त शोभायात्रा, सामाजिक उपक्रमांवर भर, गॅस तुटवड्यामुळे महाप्रसादाचा कार्यक्रम स्थगित
२२ वर्षीय तरुणीला प्रेमासाठी जबरदस्ती, लग्न मोडण्याची धमकी!, फुलंब्री तालुक्यातील घटना
प्रा. राजाराम लोंढे हत्या प्रकरण : अंगठ्या, मोबाइल जप्त करण्यात यश येईना, करण आडेच्या पोलीस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ
शहर पाणी योजनेत दखलपात्र प्रगती : धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणण्यात यश, जी. श्रीकांत यांनी पिले दोन घोट, मानले गोदामाईचे आभार!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software