- News
- सिटी क्राईम
- सराफा रोडवरील न्यू विश्वास ज्वेलर्समध्ये दोन बुरखाधारी महिलांचा धक्कादायक कारनामा… CCTV फूटेज पाहून
सराफा रोडवरील न्यू विश्वास ज्वेलर्समध्ये दोन बुरखाधारी महिलांचा धक्कादायक कारनामा… CCTV फूटेज पाहून सिटी चौक पोलिसांत धावला व्यापारी…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन बुरखाधारी महिलांनी हातचलाखीने सोन्याच्या दोन लाखांच्या बांगड्या चोरून नेल्या आहेत. सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांचा कारनामा कैद झाला आहे. ही बाब मंगळवारी (१८ मार्च) समोर आल्यानंतर व्यापाऱ्याने सिटी चौक पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या महिलांचा शोध सुरू केला आहे. ओमप्रकाश शांतीलाल पुरवार (वय ४९, रा. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन बुरखाधारी महिलांनी हातचलाखीने सोन्याच्या दोन लाखांच्या बांगड्या चोरून नेल्या आहेत. सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांचा कारनामा कैद झाला आहे. ही बाब मंगळवारी (१८ मार्च) समोर आल्यानंतर व्यापाऱ्याने सिटी चौक पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या महिलांचा शोध सुरू केला आहे.
मंगळवारी (१८ मार्च) सोन्याच्या बांगड्यांच्या डब्याचे वजन व नग मोजले असता वजन व नग कमी आले. त्या अनोळखी महिलांनीच नजर चुकवून २२ कॅरेटसारख्या १८ कॅरेटमध्ये दोन सोन्याच्या बांगड्या बनवून द्या, असे म्हणून २ लाख रुपयांच्या २२ कॅरेटच्या दोन सोन्याच्या बांगड्या (वजन ४१ ग्रॅम १२० मिलीग्रॅम) लांबवल्याचे लक्षात आले. दुकानात लावलेले CCTV फूटेज बघितले असता दोन महिलांपैकी एक महिला या बांगड्या चोरताना दिसत आहे. महिलांनी दिलेला मोबाइल नंबरही बंद येत आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ओमप्रकाश पुरवार यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुधाकर मिसाळ करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Mar 2026 23:10:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयडीसी पथकाच्या विशेष पाहणीत आज, १७ मार्चला एका बंद कंपनीत घरगुती गॅस सिलिंडर्सचा मोठा...

