संतापजनक… ८० वर्षीय नराधमाचे अडीच वर्षांच्या चिमुकलीसोबत घाणेरडे कृत्‍य!; वाळूज MIDC हादरली, पोलिसांनी २४ तासांत आवळल्‍या मुसक्या!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अडीच वर्षीय चिमुकलीसोबत ८० वर्षीय नराधमाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२७ सप्‍टेंबर) वाळूज महानगरात घडली. एका सतर्क महिलेने नराधमाच्या घाणेरड्या कृत्‍याचा व्हिडीओ काढल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. रामलाल धोंडिबा कुकलारे (वय ८०) असे संशयित वृद्धाचे नाव असून, त्‍याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी (२९ सप्‍टेंबर) […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अडीच वर्षीय चिमुकलीसोबत ८० वर्षीय नराधमाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२७ सप्‍टेंबर) वाळूज महानगरात घडली. एका सतर्क महिलेने नराधमाच्या घाणेरड्या कृत्‍याचा व्हिडीओ काढल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. रामलाल धोंडिबा कुकलारे (वय ८०) असे संशयित वृद्धाचे नाव असून, त्‍याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी (२९ सप्‍टेंबर) सकाळी अटक केली. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पीडित चिमुकली वाळूज महानगरात आई-वडिलांसह राहते. तिचे वडील कंपनीत कामाला जातात, तर आई भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावते. शुक्रवारी सकाळी अकराला चिमुकलीला घेऊन आई भाजीपाला विकायला गेली होती. दुकान सुरू करून भाजीपाला विकत असताना समोरच ओट्यावर चिमुकली खेळत होती. या ओट्यावर नराधम कुकलारे आधीच बसलेला होता. चिमुकली बाबा बाबा म्हणत त्याच्याजवळ जाऊन बसली. काही वेळाने नराधमाने तिला मांडीवर बसवून कुणी पाहत नसल्याची खात्री करून तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला.

ही बाब एका महिलेच्या निदर्शनास आली. तिने जवळील मोबाइलने त्याच्या कृत्‍याचे चित्रिकरण केले. ते चिमुकलीच्या आईला दाखवले. ते पाहून हादरलेल्या चिमुकलीच्या आईने धाव घेऊन वृद्धाच्या मांडीवरून चिमुकलीला उचलून घेतले व कंपनीत गेलेल्या पतीला कळवले. त्यानंतर पती-पत्नी चिमुकलीसह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले. पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन महिला दक्षता समितीच्या सदस्यांना बोलावून घेतले. या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून कुकलारेच्या शोधासाठी पथक रवाना केले. त्‍याला परिसरातूनच अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे तपास करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software