माझ्या नवऱ्यासोबत का बोलते म्‍हणत युवतीचे तोडले दात!; त्रिमूर्ती चौकाजवळील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माझ्या नवऱ्यासोबत का बोलते, असा जाब विचारत संतप्त महिलेने ३२ वर्षीय युवतीला मारहाण करत तिच्या डोक्‍यात स्टिलचा डबा घातला. यात तिचे दात पडले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिने जवाहरनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० जुलैला रोजी सकाळी ९ च्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माझ्या नवऱ्यासोबत का बोलते, असा जाब विचारत संतप्त महिलेने ३२ वर्षीय युवतीला मारहाण करत तिच्या डोक्‍यात स्टिलचा डबा घातला. यात तिचे दात पडले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिने जवाहरनगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० जुलैला रोजी सकाळी ९ च्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासमोर घडली.

जखमी युवती देवळाई परिसरातील हरिप्रसादनगरात राहते, तर मारहाण करणारी महिला भानुदासनगरच्या गल्ली नं. ५ मध्ये राहते. महापालिका दवाखान्यातील काम उरकून दुपारी तीनला युवती घरी जात असताना नात्‍यातील ओळखीच्या महिलेने तिला अडवले. तू माझ्या पतीसोबत का बोलते असा जाब विचारत तिने शिवीगाळ करून मारहाण सुरू केली.

हातातील जेवणाचा स्टिलचा डबा घेऊन डोक्‍यावर मारून जखमी केले. त्‍यानंतर ती निघून गेली. जखमी युवतीने आईला कॉल करून बोलावून घेतले. तिच्या आईसह ती जवाहरनगर पोलीस ठाण्यात आली. पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन तिला घाटी रुग्णालयात पाठवले. उपचार घेतल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गोरखनाथ चव्हाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software