महिलेने चप्पल काढताच रिक्षाचालकाने ठोकली धूम!; मुख्य बसस्थानकावर नक्की काय घडलं?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहायक पोलीस आयुक्‍तांनी तंबी देऊनही रिक्षाचालक सुधरायला तयार नाहीत. नियम- शिस्त पाळा, महिला व तरुणींशी चांगली वागणूक ठेवा, असा निर्वाणीचा इशारा देऊनही रिक्षाचालकांच्या पचणी पडलेला दिसत नाही. एका महिलेसोबत रिक्षाचालकाने असभ्य वर्तन केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. नक्की काय घडले?पुंडलिकनगरातून मध्यवर्ती बसस्थानकात जाण्यासाठी मंगळवारी दुपारी ४० वर्षीय महिला […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सहायक पोलीस आयुक्‍तांनी तंबी देऊनही रिक्षाचालक सुधरायला तयार नाहीत. नियम- शिस्त पाळा, महिला व तरुणींशी चांगली वागणूक ठेवा, असा निर्वाणीचा इशारा देऊनही रिक्षाचालकांच्या पचणी पडलेला दिसत नाही. एका महिलेसोबत रिक्षाचालकाने असभ्य वर्तन केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.

नक्की काय घडले?
पुंडलिकनगरातून मध्यवर्ती बसस्थानकात जाण्यासाठी मंगळवारी दुपारी ४० वर्षीय महिला मुलीसह सिटरच्या दराने रिक्षात बसली. चालकाने तिला मुख्य रस्त्याऐवजी गल्लीबोळातून नेले. महिलेने वारंवार विचारणा करूनही तो हाच रस्ता योग्य आहे, असे सांगत होता. प्रवासात त्याने एकाही प्रवाशाला न बसवल्याने महिलेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बसस्थानकावर उतरल्यावर ३० रुपये ठरलेले असताना रिक्षाचालकाने ६० रुपये मागितले.

महिलेने त्याला ३० रुपये ठरले होते, असे सांगितल्यानंतर त्याने अरेरावी सुरू केली. त्‍यामुळे संतापलेल्या महिलेने सरळ पायातील चप्पल काढून त्‍याच्यावर धावली. हा गोंधळ पाहून लोक जमले. गर्दी आणि महिलेचा उद्वेग पाहून रिक्षाचालकाने तिथून काढता पाय घेतला. महिलेची मुलगी मात्र घाबरून रडत होती. वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी सोमवारी रिक्षाचालक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. या सूचनांचे पालन बहुतांश रिक्षाचालकांनी दुसऱ्या दिवशी केल्याचे दिसून आले नाही.

विशेष मोहीम राबविण्याची गरज…
शहरात अनेक प्रामाणिक रिक्षाचालक आहे. जे नियमात प्रवासी वाहतूक करतात. प्रवाशांशी सौजन्याने वागतात. पण काही रिक्षाचालकांच्या कृत्‍यामुळे तेही बदनाम होतात. त्‍यामुळे वाहतूक पोलिसांनी व्यापक प्रमाणावर मोहीम राबवून अशा मग्रूर रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांची पळवापळवी करताना असभ्य वागणूक, प्रवाशांच्या अंगावर धावून जाणे, ठरलेल्या पैशांऐवजी उरतण्यावेळी जास्त पैसे मागणे, त्यासाठी वाद घालून अरेरावी करणे, वाहतुकीला अडथळे निर्माण करणे, चालकाच्या बाजूला किंवा मागे गेट नसतानाही प्रवाशांना बसवणे असे प्रकार रिक्षाचालकांकडून सर्रास घडत असतात.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज

Latest News

हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
जयपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ताप, अस्वस्थता जाणवू लागल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १० मार्चला जयपूर येथील सवाई मानसिंह...
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software