मध्यरात्रीतून दोन्ही मुली गेल्या कुठे? पालकांना चिंता, शोधूनही सापडत नसल्याने अखेर पोलिसांत धाव!; छत्रपती संभाजीनगरच्या घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्‍यांच्या अपहरणाची तक्रारी नोंद होतात, पण लवकर शोध लागत नसल्याने पालक चिंताग्रस्त असतात. अनेक मुलींचा तर महिनोन्‌महिने शोध लागत नसल्याचे चित्र आहे. आताही शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोघीही मध्यरात्रीतून घरातून बेपत्ता झाल्या आहेत. साडेपंधरा वर्षीय […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्‍यांच्या अपहरणाची तक्रारी नोंद होतात, पण लवकर शोध लागत नसल्याने पालक चिंताग्रस्त असतात. अनेक मुलींचा तर महिनोन्‌महिने शोध लागत नसल्याचे चित्र आहे. आताही शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोघीही मध्यरात्रीतून घरातून बेपत्ता झाल्या आहेत. साडेपंधरा वर्षीय मुलीचे हर्सूलच्या एकतानगरातून तर १४ वर्षीय मुलीचे गंगापूर तालुक्‍यातील लिंबेजळगाव येथून अपहरण झाले आहे.

पहिल्या घटनेत एकतानगरातील ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्‍या मेसमध्ये स्वयंपाक काम करतात. त्यांना एक मुलगा व चार मुली आहेत. २९ जूनला रात्री १० च्या सुमारास त्‍या व मुले-मुली जेवण करून रात्री झोपी गेले होते. ३० जूनला सकाळी सहाला झोपेतून उठून पाहिले असता त्‍यांना साडेपंधरा वर्षीय मुलगी घरात दिसली नाही. तिचा आजूबाजूला, नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. तिचे कुणीतरी अपहरण केल्याची खात्री पटल्यानंतर महिलेने मुलीच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दिली. अंगात काळा टॉप, गोल्डन रंगाची पॅन्ट आहे. ती सहावीत शिकते. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. साखळे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने वाळूज पोलीस ठाण्यात त्‍यांच्या १४ वर्षीय मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. पत्‍नी व दोन मुले, एका मुलीसह ते राहतात. २७ जूनला रात्री ११ च्या सुमारास सर्व जण जेवण करून झोपी गेले. २८ जूनला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पाणी पिण्यासाठी झोपेतून उठले असता मुलगी घरात झोपलली दिसली नाही. त्यांनी पत्नीला उठवून विचारले असता त्‍यांनाही माहीत नव्हते. त्यानंतर मुलीचा घराच्या आजूबाजूला, गावात, शेतात व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मुलगी कोठेही मिळून आली नाही. अखेर पोलिसांत अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तिच्या अंगात हिरवा टॉप व हिरवी लेगिन्स आहे. तपास पोलीस अंमलदार दशरथ खोसरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software