भररस्‍त्‍यात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी उतरवली ‘व्हिलनगिरी’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुकुंदवाडी बसथांब्‍याजवळ भररस्‍त्‍यात १५ इंची कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. ही कारवाई मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील अंमलदार सागर शर्मा यांनी शुक्रवारी (४ ऑक्‍टोबर) रात्री दहाच्या सुमारास केली. योगेश अशोक इंगळे (वय २४,रा. सिडको एन १) असे पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो धारदार कोयता घेऊन लोकांना धमकावत होता. […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुकुंदवाडी बसथांब्‍याजवळ भररस्‍त्‍यात १५ इंची कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. ही कारवाई मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील अंमलदार सागर शर्मा यांनी शुक्रवारी (४ ऑक्‍टोबर) रात्री दहाच्या सुमारास केली.

योगेश अशोक इंगळे (वय २४,रा. सिडको एन १) असे पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो धारदार कोयता घेऊन लोकांना धमकावत होता. ही माहिती मुकंदवाडी पोलिसांना मिळताच पोलीस अंमलदार सागर शर्मा यांनी तातडीने घटनास्‍थळी जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्‍या. त्‍याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपायुक्‍त नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकामधील अंमलदार सागर शर्मा, विकास गुरूखेल, नीलेश पाटेकर,संतोष बिरारे यांनी केली. अधिक तपास सहायक फौजमदार नरसिंग पवार करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...

Latest News

१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत... १८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १८ मार्चला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ९ पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची...
कर्जबाजारी शेतकऱ्याने ठिबक सिंचनच्या नळीने घेतला गळफास!, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software