- News
- सिटी क्राईम
- चोरटे २० मिनिटे झटले, पण दानपेटी जागची हलली नाही… दानपेटी उचलून न्यायची होती, पण जागची हलत नसल्याने
चोरटे २० मिनिटे झटले, पण दानपेटी जागची हलली नाही… दानपेटी उचलून न्यायची होती, पण जागची हलत नसल्याने अखेर चोरट्यांनी जोडले हात!, सिडको एन १ च्या हनुमान मंदिरातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भुरट्या चोरट्यांनीही दिवाळी साजरी केली. खडकेश्वर, पदमपुरा, सिडको एन १, गुलमंडी येथे चोरट्यांच्या कारनाम्यांनी सामान्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. त्या त्या पोलीस ठाण्यांत या घटनांची शुक्रवारी (१ नोव्हेंबर) नोंद झाली आहे. -सिडको एन-१ मधील हनुमान मंदिरातील दानपेटीच चोरून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. चोरटे लोखंडी गेट तोडून पहाटे साडेचारला मंदिरात […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भुरट्या चोरट्यांनीही दिवाळी साजरी केली. खडकेश्वर, पदमपुरा, सिडको एन १, गुलमंडी येथे चोरट्यांच्या कारनाम्यांनी सामान्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. त्या त्या पोलीस ठाण्यांत या घटनांची शुक्रवारी (१ नोव्हेंबर) नोंद झाली आहे.
-राहुल भारुका (२६) यांचे खडकेश्वर मंदिरासमोर जनरल स्टोअर आहे. दुकानात असताना त्यांच्याकडे तोंडाला रुमाल बांधलेला तरुण आला. ५०० रुपये देऊन तोंडाला लावायची क्रीम मागितली. क्रीम दिल्यानंतर त्याने पुन्हा आइस्क्रीम मागितले. राहुल फ्रीजकडे वळताच तरुणाने काउंटर उघडून गल्ल्यातील २५ हजार रुपये रोख घेऊन पळून गेला. गुरुवारी रात्री ८:३० वाजता ही चोरी झाली.
-होनाजीनगर येथील ५० वर्षीय शीला राऊत गुरुवारी गुलमंडीत खरेदी करत असताना सुपारी हनुमान मंदिराजवळ चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये हात घालून ४९ हजार रुपये व क्रेडिट कार्ड लंपास केले.
पोलीस विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात व्यस्त, त्यात दिवाळी सणाचाही बंदोबस्त अशा परिस्थितीतही मध्यरात्री १२ पर्यंत काही व्यापाऱ्यांनी बाजारपेठ सुरू ठेवू देण्यासाठी केलेला हट्ट यामुळे शहरात चोरट्यांचे फावल्याचे दिसून आले. चोरट्यांनी ६२ मोबाइल, ४ मंगळसूत्रे, ३ दुचाकी वाहने चोरून नेली. महिला आणि अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांनी ही कामगिरी बजावल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील फूटेजद्वारे पोलिसांच्या समोर आले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 08:43:27
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...

