Good News : छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा DMIC मध्ये जगप्रसिद्ध एम्ब्रेको कंपनीची एंट्री!; १०२९ कोटी रुपयांची गुंतवणूक, १ हजार जणांना थेट रोजगार मिळणार

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी गोड बातमी आहे. रेफ्रिजरेशन क्षेत्रातील जगप्रसिद्ध आणि निडेक ग्लोबल अप्लायन्स समूहाचा भाग असलेल्या एम्ब्रेको कंपनीने छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीच्या शेंद्रा इंडस्ट्रीयल झोनमध्ये तब्बल १ हजार २९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यातून १००० जणांना थेट रोजगार मिळणार आहे. कंपनीकडून या ठिकाणी अत्याधुनिक कॉम्प्रेसर उत्पादन प्रकल्प उभारला […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी गोड बातमी आहे. रेफ्रिजरेशन क्षेत्रातील जगप्रसिद्ध आणि निडेक ग्लोबल अप्लायन्स समूहाचा भाग असलेल्या एम्ब्रेको कंपनीने छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीच्या शेंद्रा इंडस्ट्रीयल झोनमध्ये तब्बल १ हजार २९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यातून १००० जणांना थेट रोजगार मिळणार आहे. कंपनीकडून या ठिकाणी अत्याधुनिक कॉम्प्रेसर उत्पादन प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एम्ब्रेको कंपनीकडून ५० एकरवर २०२६ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची शक्‍यता आहे. प्रकल्पातून दरवर्षी ६० लाख कॉम्प्रेसर युनिट्सचे उत्पादन केले जाईल. घरगुती, तसेच व्यावसायिक फ्रीजसाठी हे युनिटस् असतील. ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टरचे उत्पादनही घेतले जाणार आहे. एम्ब्रेको कंपनी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मार्चमध्ये सामंजस्य करार झाला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी शहरात येऊन शेंद्र्यातील ५० एकरचा भूखंड पाहिला होता. ऑरिक सिटीच्या डीएमआयसीमध्ये टोयटा-किर्लोस्कर मोटार्स, लुब्रिझोल इंडिया प्रा.लि., जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी, एथर एनर्जी, पिरॅमल फार्मास्युटिकल्स आदी कंपन्यांनी यापूर्वी ६४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली असून, एम्बॅकोमुळे जगप्रसिद्ध कंपन्या छत्रपती संभाजीनगरात गुंतवणूक करण्यास इच्‍छुक असल्याचा चांगला संदेश सगळीकडे गेला आहे. एम्बॅकोच्या प्रकल्पामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नव्याने मोठ्या संधी उपलब्ध होतील.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: मुंबईच्या एनआयए न्यायालयाने १७ वर्षांनंतर दिला निकाल, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज, ३१ जुलैला निकाल दिला आहे. १७ वर्षांनंतर...
घरी बसून करा हजारो रुपयांचे मोफत फेशियल!; सगळे तुम्हाला विचारतील, तुमच्या चमकत्या त्वचेचे रहस्य काय?
Feature : अतिसारामुळे शरीर कमकुवत? आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
रत्नाकर फायनान्समधून महिलांना अश्लील कॉल!; जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कसे येतात कॉल, कुठून मिळवतात नंबर, जाणून घेऊ...
मोबदला न देता मालमत्ता पाडाल तर सामूहिक आत्‍मदहन करू!;  हर्सूलवासियांचा पवित्रा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software