छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिंदे गटाच्या प्रयत्नांना सुरूंग लावत, 'जादूची कांडी' फिरवून भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचेच अविनाश गलांडे (महालगाव गटाचे सदस्य, ता. वैजापूर) आणि उपाध्यक्षपदीही भाजपचेच जितेंद्र जैस्वाल (बाबरा गटाचे सदस्य, ता. फुलंब्री) यांची बिनविरोध निवड झाली. मंत्री अतुल सावे यांनी मध्यरात्रीतून खेळलेल्या खेळीमुळे शिंदे गटाचे मनसुबे धुळीस मिळाले. शिंदे गटाला आम्ही पहिल्या अडीच वर्षांसाठी उपाध्यक्षपद आणि नंतरच्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद देण्यास तयार होतो, पण त्यांनी ते मान्य करण्याऐवजी थेट आम्हालाच सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्हीही सत्तेसाठी ‘गणित जुळवले’, असे स्पष्ट मत मंत्री अतुल सावे यांनी या वेळी स्पष्ट केले.

मागील निवडणुकीत २०१७ ते २०२२ या काळात भाजपला सर्वात जास्त संख्याबळ असतानाही सत्तेपासून वंचित राहावे लागेल. त्यावेळी शिवसेनेने (अविभाजीत) काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता ताब्यात घेतली होती. पाचही वर्षे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले होते. तोच कित्ता यावेळीही गिरवण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला. पण भाजपने त्यांचा डाव अक्षरशः उधळला. अजित पवार गट भाजपसोबत राहिला. निवडणुकीत शिंदे गटाने बहिष्काराचा, तर ठाकरे गटाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ६३ सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे स्वतःचे २३, अपक्ष २ आणि अजित पवार गट ४, प्रहार १, काँग्रेस १ असे एकूण ३१ सदस्य होते. सत्तेसाठी ३२ सदस्य हवे असल्याने आणखी एका सदस्याची ‘तजवीज’ करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी गलांडे यांची अध्यक्ष तर जैस्वाल यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. याचबरोबर जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच महायुतीत मोठा भाऊ असल्याचे सिद्ध झाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर फडकला भाजपचा झेंडा!; मध्यरात्रीतून मंत्री सावेंनी गणित जुळवले, भाजपचे गलांडे-जैस्वाल अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध झाले!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिंदे गटाच्या प्रयत्नांना सुरूंग लावत, 'जादूची कांडी' फिरवून भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा...
कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software