छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्‍याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद उर्फ मोहसीन (वय ४५, रा. जहाँगीर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) याने हर्सूल कारागृहातून रविवारी (८ फेब्रुवारी) दुपारी पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. या टोळीने खून केल्याने पोट फाडून मांस खाऊन विहिरीत मृतदेह फेकून दिला होता. ६ वर्षांपासून अमजद जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

हर्सूल जेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अमजदला २०१८ मध्ये अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्याला २०२० मध्ये न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. काही वर्षे त्याला अमरावतीच्या कारागृहात ठेवले होते. नंतर जुलै २०२४ मध्ये हर्सूल कारागृहात आणले होते. त्याने चांगली वर्तणूक दाखवून विश्वास संपादन केला. त्याच्यावर विश्वास ठेवून कारागृह प्रशासनाने कारागृहातील साफसफाईचे काम त्याला दिले होते. परिसरात साफसफाई करत असतानाच त्याने अचानक पलायन केले. ही बाब लक्षात यायला बराच वेळ लागला. त्यानंतर कारागृहात खळबळ उडाली. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून हसूल पोलिसांनी अमजदविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात भोगत होता जन्मठेप...
१६ मे २०१८ रोजी बिस्मिल्ला कॉलनी भागातील प्लॉटिंग व्यावसायिक जब्बार शेख यांचे जमिनीच्या वादातून बबला गँगने अपहरण केले होते. ही गँग शेख वाजेद उर्फ बबला चालवत होता. अमजद त्याच्या टोळीचा सदस्य होता. या टोळीने जब्बार शेख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केली होती. यात अमानुषणे पोट फाडल्यानंतर त्याचे मांस खाल्ले होते. नंतर पोटात दगड भरून मृतदेह विहिरीत फेकला होता. या अमानवीय कृत्‍याबद्दल न्यायालयाने अमजदसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Latest News

बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...
काँग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेल्या जि. प. सदस्य तृप्ती राजपूत भाजपमध्ये!; कन्नडमध्ये खळबळ 
आकाशवाणी चौक पुन्हा बंद!; ५४ दिवसांत पोलिसांचा यु टर्न..., वाढते अपघात, वाहतूक कोंडीचे दिले कारण
इंदिरानगरात घबराटीचे वातावरण : रात्री घरांवर तुफान दगडफेक, वाहने फोडली, ८ जण ताब्यात, दंगा काबू पथक तैनात
इंडिगो हाल करणार!; सायंकाळी नवी मुंबईचा हेलपाटा पडणार..., छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांमध्ये संतप्त पडसाद, नक्की काय बदल केलेत जाणून घेऊ...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software