- News
- सिटी क्राईम
- प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
शहरातील बेकायदा मालमत्ता आठ दिवसांत पाडणार; पोलीस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना दिली यादी...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील अंमली पदार्थाचे रॅकेट चालवणाऱ्या तस्करांना प्रशासन चांगलाच दणका देण्याच्या विचारात आहे. ड्रग्ज तस्करांच्या थकीत पाणीपट्टी व बेकायदा बांधकामावर थेट योगी स्टाईल कारवाई करत बुलडोझर चालवण्यासाठी ६० गुन्हेगारांची यादीच पोलिसांनी सोमवारी (१६ फेब्रुवारी) मनपाला पाठवली. या यादीची पडताळणी करून आठ दिवसांतच पोलिस बंदोबस्तात कारवाई करत त्यांच्या मालमत्ता जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.
६० जणांच्या यादीत प्रामुख्याने मुख्य तस्कर शेख अशफाक शेख इसाक पटेल (रा. रवींद्रनगर व शहाबाजार, चंपाचौक), ज्ञानेश्वर उर्फ माऊली मनोहर यादव (रा. गल्ली क्र. १४, जयभवानीनगर), सय्यद फैजल उर्फ तेजा (रा. किलेअर्क), अजय व राणी ठाकूर (रा. सातारा गाव), अनिल अंबादास साळवे (रा. सावित्रीनगर, चिकलठाणा), आदिल बिन हमद बिन चाऊस (रा. काचीवाडा, शहाबाजार), विश्वनाथ उर्फ कोल्ह्या पिंपळे (रा. गल्ली क्र. १५, संजयनगर), विशाल छगन तामचीकर (रा. नारेगाव) यांचा समावेश आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
हिनानगरातील भीषण आगीत ३ संसार खाक, अग्निशमन अधिकारीही आग विझवताना जखमी
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 08:09:58
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत राजकीय दबावाखाली येऊन आकाशवाणी चौक सुरू केल्यानंतर आता, ५४ दिवसांनी पुन्हा तो...

