दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन पैठणनगरीत उद्यापासून, जय्यत तयारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाला पैठण शहरातील न्यायालय रस्त्यावरील झुंजे हाऊस परिसरातील संत एकनाथनगरीत उद्या, २७ सप्‍टेंबरपासून ग्रंथदिंडीने सुरुवात होणार आहे. आज, २६ सप्टेंबरला रात्री ह.भ.प. सामनगावकर महाराज यांचे कीर्तन होणार होत आहे. पुणे येथील संत चोखामेळा अध्यासन केंद्र, वृंदावन फाउंडेशन, पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा […]

पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाला पैठण शहरातील न्यायालय रस्त्यावरील झुंजे हाऊस परिसरातील संत एकनाथनगरीत उद्या, २७ सप्‍टेंबरपासून ग्रंथदिंडीने सुरुवात होणार आहे.

आज, २६ सप्टेंबरला रात्री ह.भ.प. सामनगावकर महाराज यांचे कीर्तन होणार होत आहे. पुणे येथील संत चोखामेळा अध्यासन केंद्र, वृंदावन फाउंडेशन, पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने २७ आणि २८ सप्टेंबरला हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्‍थानी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे राहणार आहेत.

उद्‌घाटन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. संतोष तांबे, प्रा. संतोष गव्हाणे, विष्णू ससाने, बजरंग काळे, गणपत मिटकर, सुनील चितळे, नारायण औटे, आर. बी. रामावत, के. बी. शेख, शहादेव सुरासे, डॉ. गणेश शिंदे, संदीप काळे यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software