धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरातील प्रसिद्ध एमजीएम हॉस्पिटलची सुरक्षाव्यवस्था कूचकामी असल्याचे समोर आले आहे. रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरट्यांनी लांबवली. यात मोबाइल आणि रोकड असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना आज, ३ मार्चला पहाटे पाचला समोर आल्यानंतर खळबळ उडाली. सिडको पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

शिवकन्या वसंत खेडेकर (वय ४०, रा. मेहकर, जि. बुलडाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक आहेत. त्यांची आई लता नारायण निकस यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने शनिवारी (२८ फेब्रुवारी) एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. शिवकन्या या आईची काळजी घेण्यासाठी थांबल्या होत्या. आज, ३ मार्चला पहाटे अडीचच्या सुमारास त्या रुग्णांच्या नातेवाइकांना थांबण्यासाठी असणाऱ्या हॉलमध्ये झोपल्या होत्या.

त्यांची काळी पर्स त्यांनी उशाखाली ठेवली होती. मळमळ होत असल्याने पहाटे पाचला त्या झोपेतून उठल्या असता पर्स उशाला दिसून आली नाही. आजूबाजूला शोध घेतला असता पर्स मिळून न आल्याने त्यांना खात्री पटली की पर्स कुणीतरी चोरली आहे. पर्समध्ये त्यांचा ३५ हजारांचा मोबाइल, १० हजार रुपये रोख, आधार कार्ड, पॅनकार्ड, एसबीआयचे एटीएम कार्ड होते. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी भोसले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software