पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बायजीपुऱ्यातील संजयनगरमध्ये घडली. सध्या तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिन्सी पोलिसांनी सोमवारी (२ मार्च) या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

मोहमद साजीद अब्दुल माजीद (वय २१, रा. संजयनगर बायजीपुरा) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे. तो आई- वडील, पत्नी व मुलाबाळासह राहतो. फोरव्हिलर मेकॅनिक आहे. २४ फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास तो तरावीची नमाज पडण्यासाठी गंजेशहिदा मस्जीद येथे मोटारसायकलीने गेला होता. तिथे मोटारसायकल पार्किंगमध्ये उभी करत असताना एका तरुणासोबत त्याचा पार्किंगवरून वाद झाला. त्यानंतर तो मोटारसायकल घेऊन घरी आला. गंगा हॉस्पिटलच्या रोडवर मित्रांसह क्रिकेट खेळत असताना रात्री अंदाजे पावणेबाराच्या सुमारास मशिदीजवळ पार्किंगवरून भांडण झालेला तरुण तिथे आला. त्याने साजीदला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

साजीदने त्याला शिवीगाळ करू नको, असे म्हणताच त्याने खिशातून चाकू काढून त्याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. साजीद रक्तबंबाळ होऊन कोसळल्यानंतर तो पळून गेला. साजीदला बिलाल बागवान नवाब बागवान व उमेर यांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी औषधोपचार करून पुढील उपचारकामी घाटी रुग्णालयात पाठवले. सय्यद आलीमो‌द्दीन हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही त्या तरुणाने चाकूने उजव्या हातावर मारून जखमी केले होते. त्या हल्लेखोर तरुणाचे नाव समीर वय अंदाजे २०, बारी कॉलनी गल्ली नं.१३ असल्याचे साजीदला कळले. साजीदने पोलिसांना जबाब देताना समीरविरुद्ध तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार नंदूसिंग परदेश करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software