कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरजवळील कोलठाणच्या गाव तलावात बुडून दोन तरुणांचा बुडून मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, ३ मार्चला दुपारी घडली.

सचिन गजानन वराडे (वय २१) आणि समर्थ बाबासाहेब चितळे (वय १६, दोघे रा. सावित्रीनगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आज सकाळी आठ मित्र दुचाकीने कोलठाणवाडीच्या एका मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या तलावाजवळ थांबण्याचा मोह आवरला नाही. ५ मित्रांनी पोहण्यासाठी तलावात उडी घेतली. काठाजवळ पाणी कमी असल्याने ते पोहत असताना सचिन व समर्थ पोहत अचानक तलावाच्या खोल भागात गेले आणि दिसेनासे झाले. बराच वेळानंतर दोघे दिसत नसल्याचे पाहून सोबतच्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

फुलंब्री पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी हेही सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धावले. स्थानिक तरुणांनी तलावात उतरून दोघांना बाहेर काढले व घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सचिन आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो गॅरेजवर काम करायचा. त्याच्या पश्चात आई-वडील व एक बहीण आहे. समर्थ हा मूळचा चाकेगाव (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथील असून वर्षभरापासून चिकलठाण्यात मामाच्या घरी राहत होता. राजश्री शाहू विद्यालयात दहावीत शिकत होता. तपास सहायक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे करत आहेत.

मंदिराचा खुलासा, पत्रकारांना धमकावले...
कोलठाणच्या संबंधित मंदिराच्या काही अंतरावर घटना घडली. मृतक युवक दर्शनासाठी आले होते, याचा स्पष्ट नकार देत मंदिराशी संबंधित काहींनी पत्रकारांना मंदिराचा उल्लेख केल्याबद्दल धमकावले. विशेष म्हणजे, हे युवक ८ च्या संख्येने चिकलठाण्यावरून कोलठाण तलावाकडे पोहण्यासाठी का येतील, असा साधा प्रश्नही मंदिराशी संबंधितांना पडला नाही. तलाव मंदिराच्या जवळ नाही, अशी मखलाशीही कॉल करणाऱ्या मंदिराच्या संबंधितांनी करत, आम्ही अंतर मोजून दाखवतो, असे म्हटले. वास्तवात हा तलावात मंदिराच्या अगदी काही अंतरावर आहे. दर्शनासाठी येणारे भाविक तिथे फोटोसेशन करतात. काही तरुण मंडळी तलावात पोहतात. त्यामुळे तलावाला तारेचे सुरक्षाकुंपन घालण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मंदिर हे धार्मिक सार्वजनिक स्थळ आहे. एखाद्या स्थळाच्या आसपास घटना घडली तर वाचकांना स्थळ कळण्याच्या हेतूने त्याच्या जवळील मोठ्या स्थळाचा उल्लेख अनेकदा केला जातो. त्यामुळे मंदिराशी संबंधित लोकांनी आक्षेप घेण्याचा काहीच विषय नव्हता. मात्र ते इतके कशामुळे बिथरले, की थेट पत्रकारांना दमदाटीच्या स्वरुपात कॉल केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिराचा अर्थाअर्थी संबंध नसताना, तसा उल्लेख केला नसताना बातमीतील केवळ स्‍थळदर्शक उल्लेख का खटकला, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software