कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे मंगळवारी (१७ मार्च) समोर आले. कृष्णा सांडू काचोळे (वय ५५, रा. जवखेडा खुर्द, ता. कन्नड) आणि काकासाहेब कडूबा मुगदल (वय ३८, रा. एकतुनी, ता. पैठण) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत.

कृष्णा काचोळे यांनी सोमवारी (१६ मार्च) मध्यरात्रीतून किटकनाशक पिले. मंगळवारी सकाळी कुटुंबातील सदस्य त्यांना झोपेतून उठवण्यासाठी गेले असता ही बाब समोर आली. त्यांना नातेवाइकांनी तातडीने नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पिशोर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास जवखेडा खुर्द येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काचोळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी ते कर्जबाजारीपणामुळे चिंतित होते. त्याच नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विलास सोनवणे करत आहेत.

एकतुनीत शेतकऱ्याची आत्महत्या
एकतुनी (ता. पैठण) येथे काकासाहेब मुगदल यांनी मंगळवारी (१७ मार्च) दुपारी दीडच्या सुमारास कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. ते शेतवस्तीवर आई-वडिलांसह राहत होते. मुगदल यांच्यावर बँकेसह खासगी लोकांचे कर्ज होते. यंदा अपेक्षित उत्पन्न झाले नव्हते. त्यामुळे ते चिंतित होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. पाचोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित आणि अंमलदार बाबूराव साबळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन...
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software