- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- State News : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून युवकाची आत्महत्या; पुण्यातील घटना : पत्नीच्या प्रिय...
State News : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून युवकाची आत्महत्या; पुण्यातील घटना : पत्नीच्या प्रियकरानेही धमकावले होते, दाम्पत्य नांदेडचे
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पुणे (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नी तिच्या जुन्या मित्रासोबत राजरोस अनैतिक संबंध ठेवत होती. पतीने विरोध केला असता त्याला तिने जीवे मारण्याची धमकी दिली. प्रियकरानेही तिच्या पतीला धमकावले व तिला सोडून देण्यास सांगितले. या त्रासामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील लोणीकंद भागातील विठ्ठलवाडीत समोर आली आहे. लोणीकंद पोलिसांनी मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून महिलेसह तिच्या […]
पुणे (सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नी तिच्या जुन्या मित्रासोबत राजरोस अनैतिक संबंध ठेवत होती. पतीने विरोध केला असता त्याला तिने जीवे मारण्याची धमकी दिली. प्रियकरानेही तिच्या पतीला धमकावले व तिला सोडून देण्यास सांगितले. या त्रासामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील लोणीकंद भागातील विठ्ठलवाडीत समोर आली आहे. लोणीकंद पोलिसांनी मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मधुकर व सोपान यांच्यात भाग्यश्रीवरून बरेच वेळा वाद झाले. तिच्या माहेरी गावात असताना सोपान व त्याच्यात भांडणही झाले होते. त्यावेळी मधुकरने सोपानला “तू भाग्यश्रीला सोडून दे. मी तिला सांभाळतो. तू आमच्यामध्ये येऊ नको. नाही तर तुला सोडणार नाही,’ अशी धमकी दिली होती. भाग्यश्रीच्या वाढत्या अनैतिक संबंधामुळे आणि त्रासामुळे अखेर सोपानने ५ एप्रिलला राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर भाग्यश्री माहेरी निघून गेली. लोणीकंद पोलिसांनी भाग्यश्री व तिचा प्रियकर मधुकर केंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
उंडणगावमध्ये ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 12:41:35
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...

