State News : नरबळी देण्यासाठी भोंदूबाबा मागत होता पायाळू मुलगी!, पित्‍याने आत्‍महत्‍या केली… भोंदूबाबा गणेश लोखंडेच्या पोलीस चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

जालना (सीएससीएन वृत्तसेवा) : धामणगाव धाड (ता. जि. बुलडाणा) येथे एका जुन्या मोठ्या घरात गुप्तधन असून ते धन काढण्यासाठी नरबळी देण्यासाठी ज्ञानेश्वर भिका आहेर (वय ३०, रा. वालसा वडाळा, ता. भोकरदन) यांना त्‍यांची मुलगी देण्यासाठी स्वयंघोषित साधू गणेश दामोधर लोखंडे (रा. धामणगाव धाड) ब्‍लॅकमेल करत होता. सुरुवातीला मंदिरात ओळख करून घेतली, नंतर दाम्‍पत्‍याशी सलगी साधून […]

जालना (सीएससीएन वृत्तसेवा) : धामणगाव धाड (ता. जि. बुलडाणा) येथे एका जुन्या मोठ्या घरात गुप्तधन असून ते धन काढण्यासाठी नरबळी देण्यासाठी ज्ञानेश्वर भिका आहेर (वय ३०, रा. वालसा वडाळा, ता. भोकरदन) यांना त्‍यांची मुलगी देण्यासाठी स्वयंघोषित साधू गणेश दामोधर लोखंडे (रा. धामणगाव धाड) ब्‍लॅकमेल करत होता. सुरुवातीला मंदिरात ओळख करून घेतली, नंतर दाम्‍पत्‍याशी सलगी साधून घरी बोलवायला सुरुवात केली. नंतर काळात त्‍याचे इरादे वेगळेच असल्याचे लक्षात आल्यावर दाम्‍पत्‍याने संपर्क तोडण्याचा प्रयत्‍न केला होता. मात्र लोखंडे हट्टाला पेटला, दाम्‍पत्‍याला प्रचंड त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर आहेर यांनी ३ मार्चला गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. भोकरदन पोलिसांनी लोखंडेला गुम्‍मी (ता. बुलडाणा) येथील मठातून अटक केल्यानंतर त्‍याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

कशी झाली ओळख…
सौ. अंजना (वय २५) हिचे लग्न २०१७ मध्ये वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर आहेरसोबत झाले होते. लग्नानंतर दोघे धामणगाव धाड (ता. जि. बुलडाणा) येथील श्यामराव बाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी महिन्यातून एकदा जायचे. मंदिरात धामणगाव धाड येथीलच भोंदू साधू गणेश दामोधर लोखंडे हा दिसत असे. काही दिवसांनी या दाम्‍पत्‍याची ओळख गणेशसोबत झाली. दर महिन्याला जात असताना कधी कधी या दाम्‍पत्‍याला तो त्याच्या घरी चहा पिण्यासाठीही घेऊन जात होता. २७ नोव्‍हेंबर २०२० रोजी दाम्‍पत्‍याला मुलगी झाली. तिचे नाव ईश्वरी ठेवले. तिला घेऊनही हे दाम्‍पत्‍य धामणगाव धाड येथे दर्शनासाठी येऊ लागले होते.

गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा कट
धामणगाव धाड येथील एका जुन्या घरात मोठे गुप्तधन असून काढण्यासाठी नरबळी द्यायचा, असे लोखंडे याने ज्ञानेश्वर आहेर यांना सांगून त्‍यांची पाच वर्षांच्या मुलगी नरबळी देण्यासाठी मागितली. मुलगी पायाळू आहे, हे लोखंडे याला माहिती होते. त्याने धामणगाव येथे एक जीर्ण असलेले घर २ लाख रुपयांत विकत घेतले. त्या ठिकाणी गुप्तधन आहे ते काढण्यासाठी त्याने दीड वर्षात ३ बाय ३ चा २० फूटांचा खोल खड्डाही त्याने खोदला होता. नरबळी देण्यासाठी ज्ञानेश्वर आहेर यांना लोखंडे ही मुलगी माझीच आहे, असा दावाही करू लागला. लोखंडे हा भांडखोर असल्याने त्याच्याशी गावातील कुणी जास्त संपर्कातही नव्हते. त्याचा विवाह झालेला असून २० वर्षे वयाचा एक मुलगासुध्दा आहे. त्‍याच्याकडून पोलिसांनी एक ब्रेकर मशीन व एक पुस्तक जप्त केले आहे. त्याच्याकडे अनेक जण यायचे. त्यांचा तो गैरफायदा घेत होता. त्‍याची १० मार्चला पोलीस कोठडीची मुदत संपली. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.

या आधीची बातमी : Exclusive : शैतान चित्रपटाची कहानी भोकरदनमध्ये उतरली सत्‍यात!; दाम्‍पत्‍याच्या लाडक्‍या लेकीवर भोंदूबाबाने ठोकला दावा, इतके छळले, की मुलीच्या पित्‍याने केली आत्‍महत्‍या!!

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software