Political Story : दोन महिन्यांत पाचव्यांदा भेटी; जुळतील का युतीच्या गाठी?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

आम्ही एकत्र आलोय ते कायम एकत्र राहण्यासाठीच, असे दसरा मेळाव्यात थेट स्पष्ट करणारे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची रविवारी (५ ऑक्‍टोबर) पुन्हा भेट झाली. कधी काळी एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन्ही ठाकरे बंधू गेल्या दोन महिन्यांत पाचव्यांदा भेटल्याने दोन्ही पक्षांच्या युतीचे संकेत घट्ट झाल्याचे मानण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सदस्य संजय राऊत यांच्या नातवाचा नामकरण समारंभ मुंबईतील बीकेसी येथील सभागृहात पार पडला. राऊत यांच्या आमंत्रणावरून उद्धव व राज ठाकरे हे दोघेही या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राज व शर्मिला ठाकरे हे दोघे मातोश्री या उद्धव यांच्या निवासस्थानी गेले. तिथे दोघांत अर्धा तास चर्चा झाली. ही कौटुंबिक भेट असली तरी त्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

राज व उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे १८ वर्षे मतभेद होते. पण शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर हे दोघे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर संयुक्त बैठकही घेतली. या बैठकीत राज ठाकरे यांनी दोघे बंधू राजकारणात एकत्र काम करत राहतील का, यावर जाहीरपणे बोलणे टाळले होते. तथापि, उद्धव यांनी मात्र "आम्ही दोघे भाऊ आज एकत्र येण्यासाठी येथे जमलो आहोत.’, असे सांगत पुढेही एकत्र राहण्याचे संकेत दिले होते. एवढेच नाही तर पक्षाच्या दसरा मेळाव्यात त्यांनी असेच विधान केले होते. त्यातच आता दोन्ही बंधू पुन्हा भेटल्याने ही दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीची नांदी मानली जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे मुंबई महापालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्याचे आव्हान आहे. पण एकट्याच्या हिमतीवर ते अशक्य असल्याचे उद्धव ठाकरे स्वत:ही जाणून आहेत. आता लवकरच पुन्हा मुंबईत महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव हे राज यांना जवळ करीत असल्याची चर्चा आहे. यातूनच गणेशोत्सवादरम्यान उद्धव यांनी राज यांच्या ‘शिवतीर्थ' बंगल्याला भेट दिली होती. अर्थात, सगळ्यांना शक्यता वाटत असतानाही राज यांनी मात्र उद्धव यांच्या पक्षाच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावली नव्हती. उद्धव यांच्या भेटी घेतानाही राज स्वत:चे महत्व दाखवून देत असल्याचे यातून स्पष्ट दिसून येत आहे. अर्थात, असे असले तरी दोन्ही भावंडांमध्ये भेटी सुरूच असल्याने दोन्ही पक्षांची राजकीय आपरिहार्यतेपोटी का होईना जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...

Latest News

सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं... सासू-सून शतपावलीसाठी निघाल्या, दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी डाव साधला!; विश्वभारती कॉलनीत काय घडलं...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जेवण करून शतपावली करत सासूसोबत निघालेल्या सुनेचे ९० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी...
चोरानं कमालच केली... दुचाकीला कुल्फीची गाडी बांधली अन्‌ चोरून नेऊ लागला... असे फुटले बिंग!; गजानन कॉलनीतील घटना
धक्कादायक... कॉलेजचे ८ विद्यार्थी गांजा तस्करीत, छत्रपती संभाजीनगर शहरात टोळी बनवून चालवायचे रॅकेट, स्नॅपचॅटद्वारे गांजा मागवून विकायचे १० हजार रुपये प्रतिग्रॅम, २८ लाखांचा गांजा जप्त
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software