- Marathi News
- पॉलिटिक्स
- दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करा म्हणणाऱ्या आ. जगताप यांच्या हकालपट्टीची काँग्रेसकडून मागणी!; छत्रपती स...
दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करा म्हणणाऱ्या आ. जगताप यांच्या हकालपट्टीची काँग्रेसकडून मागणी!; छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांना निवेदन
On
.jpg)
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दिवाळीत खरेदी करताना हिंदू बांधवांकडूनच खरेदी करा, असे आवाहन करणारे अजित पवार गटाचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध कारवाईसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. जगताप यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेसतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, की दिवाळीत लोकांनी फक्त हिंदूंकडूनच खरेदी करावी. दिवाळीत फक्त हिंदू दुकानदारांनाच लाभ मिळावा याची खात्री करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पहलगाममधील लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी मारले. अजित पवारांच्या गटात असले तरी संग्राम जगताप यांची वाटचाल कट्टर हिंदुत्वाकडे सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चांतही सहभागी होऊन त्यांनी पुन्हा हिंदुत्व आळवले. अत्याचाराच्या केसेसमध्ये शंभर महिला हिंदू सापडतात आणि सर्व संशयित जिहादी असतात. आपल्यातीलच काही मानसिक खतना झालेले लोक या आरोपींना पाठिशी घालतात. जे हिरवे साप फणा काढतील त्यांना ठेचण्याची वेळ आली आहे, असे आमदार जगताप म्हणाले आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
14 Oct 2025 20:22:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...