- Marathi News
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!
On

"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यात ६५१ बालके कुपोषण श्रेणीत आहेत. या सर्व बालकांना येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, १४ ऑक्टोबरला पंचसूत्री दिली आहे. त्यानुसार महिला व बालविकास, आरोग्य, ग्रामविकास व महसूल यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्हा कुपोषण मुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
१६ ऑक्टोबर रोजी गावातील कुपोषित बालकांची नोंद घेऊन ही बालके संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी दत्तक घेणे. त्यांच्या आहार, आरोग्य विषयक दैनंदिन घडामोडींवर लक्ष ठेवणे.
१७ ऑक्टोबर रोजी स्वच्छता दिवस पाळून बालकांच्या आरोग्यकारक स्वच्छतेविषयी त्यांच्या पालकांना माहिती देणे. २८ ऑक्टोबर रोजी गावातील मान्यवरांच्या हस्ते बालकांचा पौष्टिक खाऊ देणे.
३ व ४ नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत बालकांची आरोग्य तपासणी करणे.
७ नोव्हेंबर रोजी पालकांचे समुपदेशन मेळावे घेऊन त्यांना बालकांना द्यावयाचा आहार, पोषणमूल्ययुक्त अन्न, आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता आदीबाबत मार्गदर्शन करणे.
याप्रमाणे कालबद्ध व उद्दिष्टाधारीत प्रयत्न करून १४ नोव्हेंबर बाल दिन यादिवशी जिल्ह्यातील ही सर्व ६५१ बालके कुपोषण श्रेणीतून बाहेर आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
15 Oct 2025 08:04:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जालना रोडवरील अपना मार्केटमागील सेंट फ्रान्सिस शाळेचे निर्जन मैदान सध्या नशेखोरांचा अड्डा बनले...