- Marathi News
- पॉलिटिक्स
- जिल्हा परिषद निवडणूक : धक्का, दिलासा, हसू अन् अश्रू... गट आरक्षण सोडतीनंतर सिल्लोडमधील चित्र!
जिल्हा परिषद निवडणूक : धक्का, दिलासा, हसू अन् अश्रू... गट आरक्षण सोडतीनंतर सिल्लोडमधील चित्र!

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आधी कमालीची आतुरता, उत्कंठा अन् नंतर सोडत सुरू झाल्यावर काहींना धक्क्यामागून धक्के, काहींना दिलासा, काहींच्या चेहऱ्यावर हसू तर काहींचे कंठ दाटून आलेले... हे चित्र सोमवारी सिल्लोडमध्ये दिसून आले. निमित्त होते जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी झालेल्या आरक्षण सोडतीचे.
सुरक्षित पं. स. गण शोधासाठी करावी लागणार धावाधाव
सोमवारी पंचायत समिती गणांसाठी देखील आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे (भाजप), माजी सदस्या छाया उबाळे, अनिल खरात, कविता भांबर्डे, शिवसेनेच्या सरिता चव्हाण, कासाबाई गवळे, आसेफमिया देशमुख, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या स्नुषा सावित्री लोखंडे यांचे गण राखीव झाले. यामुळे आता या सर्वांना नवीन गणांचा शोध घ्यावा लागेल. अपेक्षेप्रमाणे आरक्षण मिळाल्याने डोंगरगावचे सरपंच निजाम पठाण, शिवना येथील सेनेचे नेते शेख सलीम, कल्पना जामकर, काकासाहेब राकडे यांना संधी निर्माण झाली आहे. धानोरा व केळगाव हे नवे गण निर्माण केले गेले असून, तेथे नवख्या कार्यकर्त्यांना संधी मिळू शकणार आहे.