- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- State News : आयुर्वेदिक सेंटरच्या नावाखाली पुण्यात फोफावलाय अनैतिकतेचा बाजार!; मसाज सुरू करताच तरुणी...
State News : आयुर्वेदिक सेंटरच्या नावाखाली पुण्यात फोफावलाय अनैतिकतेचा बाजार!; मसाज सुरू करताच तरुणीकडूनच होते विचारणा...

पुणे (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पुण्यात सध्या आयुर्वेदिक सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा मोठा धंदा ठिकठिकाणी उघडण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसांत मारलेल्या छाप्यांतून ही बाब समोर आली. आयुर्वेदिक सेंटरमध्ये मसाज थेरपिस्ट म्हणून कामाला ठेवल्या जाणाऱ्या तरुणी, महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जातो. त्यातून मिळणारे पैसे सेंटर मालक आणि ती तरुणी अर्धेअर्धे मिळून घेतात. सुरुवातीला मसाज सुरू केली, की तरुणी स्वतःहून गिऱ्हाईकाला वेश्यागमनाची विचारणा करतात. याशिवाय बऱ्याच गोष्टींसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जातात. मेट्रोपोलिस पोस्टने पुण्याच्या स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीतून केलेली ही स्पेशल स्टोरी...

कविता मालक अन् मॅनेजर!
रिसेप्शन हॉलमध्ये सेंटरची मालक व मॅनेजर कविता आनंद शिंदे (वय ३८, रा. लक्ष्मी नगर, कोंढवा बुद्रूक, पुणे, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) दिसून आली. तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत तिने गिऱ्हाईकास स्पा सेंटरमधील २ नंबरच्या मसाज रूममध्ये एका महिलेबरोबर पाठवल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेचच त्या रूमकडे धाव घेऊन दार वाजवले. आतून बनावट गिऱ्हाईकाने दार उघडले. मसाज थेरपिस्ट असलेली ४० वर्षीय महिला आणि बनावट गिऱ्हाईक बाहेर आले. ही महिला कात्रजची रहिवासी असल्याचे तिने सांगितले. तिला कविताने दोन महिन्यांपासून कामावर ठेवले होते. त्या बदल्यात ८ हजार रुपये महिना देत होती.
मसाज करतानाच वेश्यागमनाची विचारणा
बनावट ग्राहक ड्राय मसाज करून घेत असतानाच थेरपिस्ट महिलेने त्याला वेश्यागमनाबाबत विचारणा करून त्यासाठी ५०० रुपये लागतील, असे सांगितले. बनावट गिऱ्हाईकाने वेश्यागमनासाठी ५०० रुपये दिले होते. ते महिलेकडून पोलिसांनी जप्त केले. तिने सांगितले, की कविता शिंदे ही तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होती. त्यासाठी कस्टमरकडून एक्स्ट्रा सर्व्हिसमध्ये हॅन्डजॉब, बॉडी टू बॉडी व वेश्यागमन यातून मिळालेल्या रकमेतून निम्मी रक्कम कविता ठेवून घ्यायची. बनावट गिऱ्हाईकाने कविता महिलेसोबत रूममध्ये जाण्याआधी १ हजार रुपये दिले होते.