Political Exclusive : जिल्हा परिषद निवडणूक : सोडतीत अनेक मातब्बरांचे गट आरक्षित, काहींना पुन्हा संधी!; वाचूया, कोणता गट कुणासाठी आरक्षित...

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट आरक्षणांची सोडत सोमवारी (१३ ऑक्‍टोबर) काढण्यात आली. यात अनेकांचे गट आरक्षित झाल्याचे त्यांच्यावर अन्य पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. इच्छुकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, माजी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, केशव तायडे, माजी सभापती किशोर बलांडे, सदस्य रमेश गायकवाड यांच्या जागा आरक्षित झाल्याने त्यांना अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत, तर माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती विनोद तांबे, अविनाश गलांडे, सदस्य जितेंद्र जैस्वाल, रमेश पवार, पूनम राजपूत, पंकज ठोंबरे यांना पुन्हा त्याच गटातून लढण्याची संधी प्राप्त झाली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत एकेका गटाची सोडत काढण्यात आली. सानवी वाघ ही चिमुकली जशी एकेक चिठ्ठी काढू लागली, तसे इच्छुक उमेदवारांची धडधड वाढत होती.

सोडतीनंतर काहींचे चेहरे फुलले, तर अनेकांचे चेहरे उतरले. रोटेशन पद्धत अवलंबण्याऐवजी सर्व सोडती नव्याने काढल्याने नाराज इच्छुकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतल्याने सोडतीचे प्रकरण न्यायालयात जाण्याचीही शक्यता आहे. काहींनी मात्र गटाची संधी हुकली असली तरी पंचायत समितीकडे मोर्चा वळविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, एकनाथ बंगाळे, दिनेश झांपले यांची सोडत काढतेवेळी उपस्थिती होती. गेल्या ३ वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे. २०२२ मध्येच मागील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. आरक्षण सोडतीवर आक्षेप १६ ऑक्‍टोबरपर्यंत दाखल करावा. त्यावर सुनावणीअंती निर्णय होईल, असे या वेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

असे आहे आरक्षण
एकूण गट ६३, एकूण महिला आरक्षित ३२
सर्वसाधारण : ३५ (महिला १७), एससी ८ (महिला ४), एसटी ३ (महिला २), ओबीसी १७ (महिला ९)
छत्रपती संभाजीनगर तालुका : लाडसावंगी- सर्वसाधारण, गोलटगाव-ओबीसी महिला, करमाड-एससी  महिला, सावंगी-ओबीसी, दौलताबाद- एससी महिला, वडगाव कोल्हाटी उत्तर पर्व -ओबीसी महिला, वडगाव कोल्हाटी मध्यम पश्चिम -सर्वसाधारण, पंढरपूर- एससी महिला, आडगाव बुद्रूक-सर्वसाधारण, पिंप्री बुद्रूक -सर्वसाधारण महिला.
फुलंब्री तालुका : बाबरा-ओबीसी, वडोदबाजार -ओबीसी, पाल-सर्वसाधारण महिला, गणोरी-सर्वसाधारण.
पैठण तालुका : चितेगाव- सर्वसाधारण, बिडकीन -सर्वसाधारण, आडूळ बुद्रूक-ओबीसी महिला, पाचोड बुद्रूक-सर्वसाधारण, दावरवाडी-ओबीसी महिला, ढोरकीन (ओबीसी महिला), पिंपळवाडी पिराची -एससी, विहामांडवा व नवगाव -सर्वसाधारण.
खुलताबाद तालुका : बाजारसावंगी-सर्वसाधारण महिला, गदाना -सर्वसाधारण महिला, वेरूळ – ओबीसी.
गंगापूर तालुका : सावंगी- एससी महिला, अंबेलोहळ -एससी, रांजणगाव शेणपुंजी- एससी, वाळूज बुद्रूक -एससी, तुर्काबाद -ओबीसी महिला, शिल्लेगाव -सर्वसाधारण महिला, नेवरगाव-ओबीसी महिला, जामगाव-सर्वसाधारण महिला, शेंदूरवादा -ओबीसी.
कन्नड तालुका : नागद -सर्वसाधारण महिला, करंजखेडा -सर्वसाधारण, चिंचोली लिंबाजी- सर्वसाधारण, पिशोर -सर्वसाधारण, कुंजखेडा -सर्वसाधारण महिला, हतनूर -सर्वसाधारण महिला, जेहूर -एसटी महिला, देवगाव रंगारी -सर्वसाधारण.
सिल्लोड तालुका : अजिंठा -सर्वसाधारण महिला, शिवना- ओबीसी महिला, उंडणगाव -एससी महिला, अंभई -ओबीसी, घाटनांद्रा -सर्वसाधारण महिला, डोंगरगाव -सर्वसाधारण, भराडी -सर्वसाधारण, अंधारी- सर्वसाधारण महिला, केऱ्हाळा -सर्वसाधारण महिला.
वैजापूर तालुका : वाकला -सर्वसाधारण महिला, बोरसर- सर्वसाधारण, शिऊर -ओबीसी, सवंदगाव -सर्वसाधारण महिला, लासूरगाव -सर्वसाधारण महिला, घायगाव -ओबीसी, वांजरगाव-सर्वसाधारण, महालगाव -सर्वसाधारण.
सोयगाव : फर्दापूर -सर्वसाधारण महिला, आमखोडा -ओबीसी महिला, गोंदेगाव- एसटी महिला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!

Latest News

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले! सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...
१७ वर्षीय मुलीचा मोबाइल स्विच्ड ऑफ येताच वडील शाळेत धावले, फूस लावून कुणीतरी पळवले!, किराडपुऱ्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘एक हात मदतीचा’ ; गुरुवारपासून मिळणार मदत
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्‌सलाही २८ ऑक्‍टोबरपर्यंत सुट्टी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software