- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- National News : सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही म्हणत वकिलाने सरन्यायाधीश गवईंवर फेकला बूट!
National News : सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही म्हणत वकिलाने सरन्यायाधीश गवईंवर फेकला बूट!
On

"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
नवी दिल्ली (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा देत एका वकिलाने भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने देशभर खळबळ उडाली आहे. सोमवारी (६ ऑक्टोबर) एका खटल्याचे कामकाज सुरू असतानाच हा प्रकार घडला. हल्लेखोर वकिलाचे नाव राकेश किशोर (वय ७१) असून, तो २०११ पासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करतो.
राकेशला दिल्ली पोलिसांनी ३ तास चौकशी करून सोडून दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचे कारण यासाठी देण्यात आले. घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी कामकाजही थांबवले नाही. अशा घटनेने कोणीही विचलित होऊ नये. मीही झालेलो नाही. अशा घटनांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेशचे तत्काळ निलंबन केले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
14 Oct 2025 20:22:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...