Exclusive : शैतान चित्रपटाची कहानी भोकरदनमध्ये उतरली सत्‍यात!; दाम्‍पत्‍याच्या लाडक्‍या लेकीवर भोंदूबाबाने ठोकला दावा, इतके छळले, की मुलीच्या पित्‍याने केली आत्‍महत्‍या!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

जालना (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये शैतान चित्रपटाची कहानी सत्‍यात उतरली आहे. ज्‍याप्रमाणे या चित्रपटात भोंदूबाबाच्या भूमिकेतील आर. माधवन हा अजय देवगणच्या मुलीवर हक्‍क गाजवून तिला सोबत नेण्याचा हट्ट करतो. त्‍याचप्रमाणे भोकरदन तालुक्‍यातील एका दाम्‍पत्‍याच्या मुलीवरही एका भोंदूबाबाने दावा ठोकला. सुरुवातीला मंदिरात ओळख करून घेतली, नंतर या दाम्‍पत्‍याशी सलगी साधून घरी […]

जालना (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये शैतान चित्रपटाची कहानी सत्‍यात उतरली आहे. ज्‍याप्रमाणे या चित्रपटात भोंदूबाबाच्या भूमिकेतील आर. माधवन हा अजय देवगणच्या मुलीवर हक्‍क गाजवून तिला सोबत नेण्याचा हट्ट करतो. त्‍याचप्रमाणे भोकरदन तालुक्‍यातील एका दाम्‍पत्‍याच्या मुलीवरही एका भोंदूबाबाने दावा ठोकला. सुरुवातीला मंदिरात ओळख करून घेतली, नंतर या दाम्‍पत्‍याशी सलगी साधून घरी बोलवायला सुरुवात केली. नंतर काळात त्‍याचे इरादे वेगळेच असल्याचे लक्षात आल्यावर दाम्‍पत्‍याने संपर्क तोडण्याचा प्रयत्‍न केला असता त्‍याचे खरे रुप समोर आले. ही माझीच मुलगी आहे, असे म्‍हणत तो इतका हट्टाला पेटला आणि दाम्‍पत्‍याला त्रास देऊ लागला, की या त्रासाला कंटाळून मुलीच्या पित्‍याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (३ मार्च) सायंकाळी घडली. भोकरदन पोलिसांनी भोंदूबाबाला गुम्‍मी (ता. बुलडाणा) येथील मठातून अटक केली. ज्ञानेश्वर भिका आहेर (वय ३०, रा. वालसा वडाळा, ता. भोकरदन) असे आत्‍महत्‍या केलेल्या पित्‍याचे नाव आहे.

काय आहे स्टोरी…
सौ. अंजना ज्ञानेश्वर आहेर (वय २५, रा. वालसा वडाळा, ता. भोकरदन जि. जालना) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिचे लग्न २०१७ मध्ये ज्ञानेश्वरसोबत झाले. लग्नानंतर दोघे धामणगाव धाड (ता. जि. बुलडाणा) येथील श्यामराव बाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी महिन्यातून एकदा जायचे. या मंदिरात धामणगाव धाड येथीलच भोंदूबाबा गणेश दामोधर लोखंडे हा दिसत असे. काही दिवसांनी या दाम्‍पत्‍याची ओळख गणेशसोबत झाली. दर महिन्याला जात असताना कधी कधी या दाम्‍पत्‍याला तो त्याच्या घरी चहा पिण्यासाठीही घेऊन जात होता. २७ नोव्‍हेंबर २०२० रोजी दाम्‍पत्‍याला मुलगी झाली. तिचे नाव ईश्वरी ठेवले. तिला घेऊनही हे दाम्‍पत्‍य धामणगाव धाड येथे दर्शनासाठी येऊ लागले.

त्‍याची नजर खटकली अन्‌…
सन २०२३ मध्ये गणेश लोखंडे हा मंदिरात अंजनाकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे तिला जाणवले. तिने ही बाब पती ज्ञानेश्वरला सांगितली. त्यानंतर या दाम्‍पत्‍याने गणेशसोबत बोलणे बंद केले होते. त्यामुळे गणेश विनाकारण या दाम्‍पत्‍याला मोबाइलवर कॉल करत होता. ही बाब दाम्‍पत्‍याने धामणगाव धाड येथील प्रतिष्ठीत गावकरी भिमराव पायघन, पोलीस पाटील व इतरांना सांगितली. त्यांनी सर्वांनी मिळून गणेशला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून समजावून सांगितले. मात्र तरीही तो काही एक ऐकत नसल्याने अंजनाने भोकरदन पोलीस ठाण्यात त्‍याच्याविरुद्ध शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र त्यानंतरही त्याने दाम्‍पत्‍याला लेखी पत्र पत्त्यावर पाठविण्यास सुरुवात केली. त्या पत्रात अंजनाबद्दल अपशब्द वापरायचा. तुमची मुलगी ही माझीच आहे. ती मला पाहिजे. नाहीतर मी तुमच्यावर पाच ते दहा लाखांचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करेल, असे तो म्हणत होता. त्यामुळे ज्ञानेश्वर चिंताग्रस्त झाला. त्‍याला नैराश्याने गाठले. तो अंजनाला म्हणू लागला, की गणेश आपल्याला विनाकारण का त्रास देत आहे…

त्‍या दिवशी थेट नोटीस आली!
२५ फेब्रुवारीला सकाळी ज्ञानेश्वरच्या वालसा वडाळा येथील घरी पोस्टमन नोटीस घेऊन आला. ही नोटीस अंजनाने वाचली. गणेश लोखंडे याने बुलडाणा कोर्टातील वकिलामार्फत ही नोटीस पाठवली होती. नोटीसमध्ये त्याने अंजनाविरुद्ध सहा लाख रुपयांचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा उल्लेख होता. अंजनाने पती घरी आल्यावर त्‍याला ही नोटीस वाचून दाखवली. त्‍यानंतर ज्ञानेश्वर खूप घाबरून गेला. तणावाखाली आला. अंजना त्याला धीर देत होती. ३ मार्चला सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वर घरातून शेतात गेला. दुपारी १ ला तिला पतीचा कॉल आला. त्याने तिला सांगितले, की गणेश मला फोन करून विनाकारण त्रास देत आहे. आता मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेणार आहे, असे म्हणून त्याने फोन कट केला. नंतर अंजनाने वारंवार कॉल करूनही त्‍याने उचलला नाही. दुपारी साडेचारला शेतात गर्दी झालेली अंजनाने पाहिली. शेतातील लिंबाच्या झाडाला ज्ञानेश्वरने दोरीने गळफास घेतला होता. गावातील लोकांनी दोरी कापून त्‍याला फासावरून काढत भोकरदनच्या सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. ज्ञानेश्वरवर अंत्‍यसंस्कार केल्यानंतर अंजनाने भोकरदन पोलीस ठाण्यात गणेशविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्‍याचा शोध पोलीस निरीक्षक राकेश नेटके यांनी युद्धपातळीवर सुरू केला. तो गुम्‍मी (ता. बुलडाणा) येथील मठात लपून बसल्याचे कळताच त्‍याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश नेटके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software