लांच्छनास्पद : ‘बीव्हीजी'चं डोकं फिरलं; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना चक्क दिले ‘चिकन मसाला'चे दिवाळी गिफ्ट!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पुणे (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : आनंद वाटल्याने वाढतो असे म्हणतात. मात्र असा आनंद विकृत स्वरुपाचा असेल तर तो टीकेचा केंद्रबिंदू ठरतो. पुण्यातील बीव्हीजी कंपनीने दिवाळीनिमित्त लुटलेला असाच विकृत आनंद सध्या अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या पंढरीत संतापाचा विषय ठरला आहे. या कंपनीने पंढरपुरातील विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त चक्क चिकन मसालाचे पाकीट गिफ्ट म्हणून दिले आहेत.

पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या किनारी उभे असलेले विठ्ठल मंदिर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे तीर्थक्षेत्र. या मंदिरात उभी असलेली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती म्हणजे देशोदेशीच्या भाविकांचे आराध्य दैवत. दरवर्षी कोट्यवधी भाविक या मंदिराला भेट देऊन विठुरायाच्या चरणी लीन होतात. त्यामुळे या मंदिराची सुरक्षा देखील महत्त्वाचा विषय मानला जातो. याच अनुषंगाने या मंदिराच्या सुरक्षेसाठी अनेक सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीने पुण्यातील बीव्हीजी या अनेक कारणांमुळे वादात राहणाऱ्या कुप्रसिद्ध कंपनीला दिली आहे. या कंपनीने मंदिराच्या सुरक्षेसाठी शेकडो सुरक्षा सुरक्षकांची नियुक्ती केली आहे.
बीव्हीजी कंपनी दरवर्षी दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना गिफ्ट देते. मात्र, यंदा या कंपनीच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वतःचे डोके फिरले आहे, याचा दाखला देत चक्क विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा रक्षकांना दिवाळी गिफ्ट म्हणून थेट चिकन मसाल्याच्या पाकिस्तानचे वाटप केले आहे.

संतापाची लाट 
बीव्हीजी कंपनीकडून दिवाळी गिफ्टची पाकिटे हाती पडल्यानंतर या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आनंद झाला. मात्र, त्यांचा हा आनंद काही क्षणही टिकला नाही. कारण गिफ्ट म्हणून मिळालेल्या पाकिटांमध्ये मिठाई असेल, अशी अपेक्षा बाळगलेल्या या सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाकिटे फोडल्यावर चिकन मसाला दिसताच त्यांच्या आनंदावर विरजण पडले. सोबतच बीव्हीजी कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल संतापाची लाटही उसळली. विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या अनोख्या गिफ्टची परिसरात चर्चा सुरू झाली.

विठ्ठल भक्तांच्या सांप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणून ओळखले जाते. या वारकरी संप्रदायामध्ये शाकाहाराला अत्यंत महत्त्व आहे. मात्र, यंदा बीव्हीजी कंपनीच्या प्रशासनाने शाकाहाराला महत्त्व देणाऱ्या वारकरी सांप्रदायाचे रक्षण करणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा रक्षकांना चक्क चिकन मसालाची पाकिटे देऊन संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. तसेच बीव्हीजी कंपनीने केवळ वारकरी सांप्रदायाचाच अवमान केला नसून धार्मिक मान्यतांचेही उल्लंघन केल्याची प्रतिक्रिया अवघ्या पंढरपुरात आणि राज्यभरातील वारकरी संप्रदायात उमटली आहे.

कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करावे...
विठ्ठल मंदिर प्रशासनाने बीव्हीजी कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याची गरज असताना अद्याप तसे करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मंदिर प्रशासनातील काहींशी बीव्हीजी कंपनीचे आर्थिक संधाण असल्याने कंपनीला पाठिशी घातले जात असल्याची चर्चा आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software