एक लांडगा घरासमोर आला... असहायपणे उपचार करा म्हणाला, उपचार होताच जंगलात परत गेला... पुस्तकातील गोष्ट नव्हे, फर्दापूरची खरीखुरी घटना आहे!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर शिवारातील शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकरी ईश्वर निकम यांच्या घरासमोर चक्क लांडगा आला. त्यामुळे निकम घाबरून गेले. मात्र हा लांडगा हल्ला करण्यासाठी नाही तर स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी आल्याचे लक्षात येताच त्यांनी वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क केला. तापेने फणफणलेल्या लांडग्यावर डॉक्टरांनी औषधोपचार करत इंजेक्शन दिले. आपल्यावर उपचार झाल्याचे जणू लांडग्याला उमजले अन्‌ तो शांतपणे वळून जंगलाच्या दिशेने गेला...

ऐकायला आश्चर्य वाटेल पण खरोबरच ही घटना घडली आहे. दारात पूर्ण वाढ झालेला लांडगा पाहून गुरुवारी (१२ मार्च) सकाळी शेतकरी निकम प्रचंड भ्याले होते. निकम यांनी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा केला. मात्र लांडगा तिथून हलण्याचे नाव घेत नव्हता. उलट, तो शांतपणे तिथेच बसून राहिला. त्याच्या डोळ्यांत हिंस्त्रपणाऐवजी असहायता दिसून आल्याने लांडगा आजारी असल्याचे व मानवी वस्तीवर उपचारासाठी शरण आल्याचे निकम यांच्या लक्षात आले. या घटनेची चर्चा संपूर्ण सोयगाव तालुक्यात होत आहे.

पाणवठे निर्माण करण्याची गरज...
उन्हाळा सुरू झाल्याने जंगलातील पाणीसाठे आटले असून, वन्यप्राणी आता पाण्याच्या शोधातही मानवी वस्तीत शिरू शकतात. त्यामुळे वनविभागाने तातडीने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करून प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्राणीमित्रांकडून होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...

Latest News

CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप... CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (१२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन शहरातील रमाई आवास...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
एक लांडगा घरासमोर आला... असहायपणे उपचार करा म्हणाला, उपचार होताच जंगलात परत गेला... पुस्तकातील गोष्ट नव्हे, फर्दापूरची खरीखुरी घटना आहे!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software