हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एका ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केलेल्या राड्याप्रकरणी अखेर गुरुवारी (१२ मार्च) रात्री साडेआठला सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेसह तिच्या एका पुरुष साथीदाराविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला असून, दोघांनी हॉटेल व्यावसायिकावर चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हॉटेल व्यावसायिकाविरुद्ध या महिलेने सातारा पोलिसांत बलात्काराची तक्रार केली होती.

बीड बायपास भागात राहणाऱ्या ४२ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचे बीड बायपास भागातच हॉटेल आहे. शिवाजीनगरात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने २६ नोव्‍हेंबर २०२५ रोजी सातारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. ती त्यांच्या ओळखीची होती.
सिडको बसस्थानकावर काय घडलं...
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सिडको बसस्थानकावर अकलूजवरून येणाऱ्या बसमध्ये व्यावसायिकाच्या मुलासाठी काही पुस्तके येणार असल्याने ते व त्यांचा मुलगा पुस्तके घ्यायला आले होते. सिडको बसस्थानकावर बापलेक पोहोचताच बलात्काराची तक्रार करणारी महिला आणि तिच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती असे कारने आले. आल्या आल्या त्यांनी हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करायला सुरुवात केली. महिलेसोबत आलेल्या व्यक्तीच्या हाती चाकू होता. त्याने त्या चाकूने हॉटेल व्यावसायिकावर हल्ला केला. मात्र व्यावसायिकाने चपळाईने बाजूला होऊन स्वतःचा बचाव केला. त्यावेळी महिलेने व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी, तेथे पडलेल्या लाठीने मारहाण करून "तुला व तुझे खानदान नष्ट करून टाकेल’, अशी धमकी दिली.

हॉटेल व्यावसायिक पोलिसांना कॉल करत असताना तिने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून जमिनीवर आदळून फोडला. पोलिसांना संपर्क केल्याचे कळल्याने ती सोबतच्या व्यक्तीसोबत पळून गेली. झटापटीत व्यावसायिकाची सोन्याची चैन व १३ हजार रुपये रोख रक्कम गहाळ झाली. या ठिकाणी सिडको एमआयडीसी पोलीस आले. त्यांच्यासोबत हॉटेल व्यावसायिक पोलीस ठाण्यात गेले. गंभीर मार लागलेला असल्याने पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन त्यांना घाटी रुग्णालयात पाठवले. वडिलांना मारहाण झाल्याने मुलगा प्रचंड घाबरलेला होता. या घटनेचा त्याच्या मनावर इतका परिणाम झाला की तो शाळेत जाण्यासही तयार नव्हता. उपचारानंतर बरे झाल्यावर हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांत येऊन महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चंदनसिंग उसारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software