- News
- पॉलिटिक्स
- CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन् अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जल...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन् अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (१२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन शहरातील रमाई आवास योजनेतील घोटाळा समोर आणला. या योजनेत बोगस लाभार्थी घुसवण्यासाठी टोळी सक्रिय झाल्याचे सांगत या टोळीने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नावाने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गौप्यस्फोट जलील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. केवळ ५ हजार रुपयांत ही टोळी जातीचे दाखले आणि उत्पन्न प्रमाणपत्रे बनवून देत असल्याचे पुरावेच त्यांनी सादर केले.
जलील यांनी मंत्री अतुल सावे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सावे यांनी रमाई योजनेत महापालिका आयुक्तांना आदेश दिल्याचे जलील म्हणाले. माजी नगरसेवकांनी लुटीत बोगस लाभार्थी घुसवल्याचे सांगताना त्या माजी नगरसेवकांची नावेही जलील यांनी वाचून दाखवली. यात महेंद्र सोनवणे यांनी ७००, अरुण बोर्डे यांनी ३०० प्रकरणे केल्याचा आरोप त्यांनी केल. याशिवाय जालिंदर शेंडगे, अमित भुईगळ, रुपचंद वाघमारे, जितेंद्र सोनवणे, राहुल सोनवणे यांचीही नावे घेतली.
प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करण्याचा छंदच जलील यांना लागला असून, त्यांनी केलेली आंदोलने आजवर अर्धवट सोडली आहेत. त्यांनी नेहमीच कॉम्प्रमाइज केले आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी ते स्टंटबाजी करत असतात. माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत, असे स्पष्टीकरण मंत्री सावे यांनी देत ठोस पुरावे देण्याचे आव्हान जलील यांना केले.
जिल्हाधिकारी म्हणाले...
दरम्यान, या आरोपाबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, की इम्तियाज जलील यांनी सादर केलेले रेशनकार्ड प्रथमदर्शनी बोगस दिसत आहे. उत्पन्न प्रमाणपत्रावरील क्यूआर कोडमध्येही छेडछाड केलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 17:43:27
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...

