‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ल्याला बुधवारी (११ मार्च) सकाळी पावणेनऊला लागलेली आग १२ तासांनंतरही धगधगत होती. गुरुवारी (१२ मार्च) सकाळपर्यंत काही झाडांच्या खोडांतून धूर निघत होता.  किल्ल्याच्या परिसरात ठिकठिकाणी ओढून फेकलेली सिगारेटची थोटके आढळली आहेत. त्यामुळे आग निष्काळजीपणानेच लागल्याचे दिसून येते.

आता खबरदारीचा उपाय म्हणून किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच सिगारेट व काडीपेटीची तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. पर्यटकांकडील धूम्रपान साहित्य रोखण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी आणि आज, १३ मार्चलाही पर्यटकांच्या पिशव्या, खिसेही तपासण्यात आले. देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी मंदिरासमोरील गवताला आधी आग लागली होती. ती वाढून ३०० एकरांपर्यंत पसरली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी साडेचारपर्यंत  आग आटोक्यात आणली. मात्र धग गुरुवारी सकाळपर्यंत कायम होती. आगीमुळे किल्ल्यावरील पशू-पक्षी होरपळले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software