- News
- जिल्हा न्यूज
- कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक...
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्महत्या
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी समोर आली.
फुलंब्री तालुक्यातील मानमोडी शिवारात मुकेश रमेश जमरा (वय २५, रा. सराई, ता. जि. खंडवा, मध्य प्रदेश) या परप्रांतीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी १० वाजता समोर आली. मुकेश सहा महिन्यांपूर्वी गावाकडून फुलंब्री येथे कामासाठी आला होता. तो एका अद्रक व्यापाऱ्याकडे अद्रक धुण्याचे काम करत होता. गुरुवारी (१२ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास त्याने मानमोडी परिसरातील शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. शुक्रवारी सकाळी ही बाब लक्षात आली. फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह खाली उतरवून फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर नातेवाइक मृतदेह घेऊन गावाकडे रवाना झाले. मुकेशच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास पोलीस अंमलदार रमेश सोनुने करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 10:59:13
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...

