Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर प्रकल्प साकारणार असल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे. या माहितीला एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकारीक सूत्रांनी पुष्टी केली असून, या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच जयपूर एमआयडीसीतील जागेची पाहणीही केल्याचे सूत्रांनी सांगितले.

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी चारचाकी वाहन निर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असून, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकल्प साकारण्याचा निर्णय उद्योग विभागाला कळविला होता. त्यांनी जमिनीची मागणी केली, तेव्हा ऑरिकमध्ये १५० एकर व जयपूर एमआयडीसीतील १५० एकर जमीन या कंपनीला दाखविण्यात आली. महिंद्रा ग्रुपच्या अधिकाऱ्यांना जयपूर एमआयडीसीतील जमीन पसंत पडली. लवकरच उद्योग विभागासोबत ही कंपनी सामंजस्य करार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ऑरिकमध्ये भूखंड शिल्लक नाही...
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत ऑरिक सिटीच्या शेंद्रा, बिडकीन या दोन्ही औद्योगिक पट्ट्यांत एकूण १० हजार एकर जमीन संपादित करण्यात आली होती. गेल्या ७ वर्षांत देश- विदेशातील कंपन्यांनी सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केल्या या पट्ट्यांत केल्या आहेत. ऑरिक शेंद्रामधील ८० टक्के कंपन्यांनी उत्पादनही सुरू केले आहे, तर काहींचे अद्याप बांधकाम सुरू आहे. बिडकीन औद्योगिक पट्ट्यातही गुंतवणूक केलेल्या कंपन्यांनी शासनाच्या विविध विभागांकडून परवाने मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.

बहुतेक कंपन्या ईव्ही मोटार्सचे उत्पादन करणाऱ्या असल्याने छत्रपती संभाजीनगर आगामी काळात ईव्ही हब म्हणून उदयाला येणार आहे. ऑरिकमध्ये औद्योगिक भूखंड सध्या शिल्लक नसल्याचे सूत्रांनी सांगितले. टोयोटा-किर्लोस्कर मोटार्स, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी, एथर एनर्जी, पिरॅमल फार्मा, लुब्रीझॉल, सँगो इंडिया प्रा. लि. एन. एक्स लॉजिकस्टिक तसेच कॉस्मो फिल्म, ए.सी.जी. कॅप्सूल, वॉरेन रेमेडीज, गोदावरी न्यू एनर्जी व एनएलके या कंपन्यांनी डीएमआयसीत केलेल्या गुंतवणुकीमुळे अनेक कंपन्यांचा ओढा छत्रपती संभाजीनगरकडे वाढला आहे.

बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आणखी ४४ हजार कोटींचे प्रकल्प येणार
डीएमआयसीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आणखी ४४ हजार कोटींचे नवीन प्रकल्प येणार असल्याची माहिती डीएमआयसीच्या सूत्रांनी दिली. त्यांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऑरिक’ने आणखी आठ हजार एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software