प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जुन्या प्रेमप्रकरणाच्या धुसफुसीतून तरुणाला लोखंडी रॉड, बेल्टसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना जुना मोंढा रोहिदासपुरा येथे बुधवारी (११ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जिन्सी पोलिसांनी हल्लेखोर ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा तरुण प्रेम प्रकरणात मदत करत असल्याचा संशय हल्लेखोरांना होता.

स्वप्निल धुलीचंद सरोणे (वय २०, रा. जुना मोंढा रोहिदासपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो फोटोग्राफरचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. बुधवारी (११ मार्च) त्याचा सख्खा मोठा भाऊ व्यंकटेश सरोने याची लग्नाची वरात असल्याने स्वप्निल कुटुंबासह वरातीत आला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास वरात संपल्यानंतर भावाने त्याला घरून चप्पल आणण्यासाठी पाठवले. स्वप्निल घरी जात असताना रोहिदास महाराज कमानीजवळ त्याचे दाजी पवन दीपक चौंडीये यांचा भाऊ रोहन चौंडीये याचे त्याच्या जुन्या प्रेम प्रकरणावरून गोरमे कुटुंबाशी भांडण चालु होते. स्वप्निलला पाहून मनोज बबनराव गोरमे (वय ४८, रा. जुना मोंढा रोहिदासपुरा) यांनी हा पण याच्या दाजीच्या भावाला मदत करतो, असे म्हणून स्वप्निलला पकडले आणि ढकलले.

त्याचवेळी योगेश मोहनलाल गोरमे (वय ४२) यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने स्वप्निलच्या उजव्या हाताला मारून जखमी केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून पवन दीपक चौंडीये, शुभांगी चौंडीये, विकास सरोणे, पवन टेरकिये तेथे स्वप्निलला वाचवण्यासाठी आले. त्यावेळी अशोक गोरमे (वय ४२), किशोर गोरमे (वय ४४) हे सर्व लाथाबुक्क्यांनी स्वप्निलला कमरेच्या बेल्टने मारहाण करत होते. गल्लीतल्या लोकांनी भांडण सोडविले. त्यानंतर स्वप्निल व कुटुंबीय लग्नाच्या हॉलवर गेले असता त्यांच्यातील अशोक गोरमे व किशोर गोरमे यांनी स्वप्निलच्या जुन्या घराचा दरवाजा तोडल्याचे नातेवाइकांनी फोन करून सांगितले. अधिक तपास पोलीस अंमलदार विलास सहाणे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software