- Marathi News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही बलात्कार केला, मग एफआयआर रद्द होणार नाही : हायकोर्ट
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही बलात्कार केला, मग एफआयआर रद्द होणार नाही : हायकोर्ट
.jpg)
नागपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा गुन्हा केला. मग तिच्याशीच लग्न केले. आता त्या मुलीने मुलाला जन्म दिला म्हणून आरोपीच्या गुन्हेगारी कृत्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुलाचा जन्म गुन्हेगारी कृत्याला कमी करू शकत नाही, असे खडे बोल सुनावत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात एफआयआर रद्द करण्यास नकार दिला.
पीडित मुलगी आता प्रौढ असून तिने न्यायालयात आरोपीच्या बाजूने जबाब दिला. आरोपीसोबतच्या नात्याला माझी संमती होती आणि दोन्ही कुटुंबांच्या मान्यतेने आमचा विवाह निश्चित झाला होता, असे पीडितेने न्यायालयाला सांगितले. यानंतर तिच्या वकिलाने न्यायालयाला हा खटला "किशोरवयीन प्रेमाचा अपवादात्मक खटला’ म्हणून हाताळण्याची विनंती केली. परंतु खंडपीठाने "अल्पवयीन मुलीची संमती अप्रासंगिक होती, असे स्पष्ट केले. आरोपी २९ वर्षांचा होता आणि त्याने मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत वाट पाहायला हवी होती, असेही न्यायालयाने सुनावले.
आरोपीवर खटला चालवल्याने आई आणि बाळ दोघांचेही नुकसान होईल, असा वकिलाचा युक्तिवादही खंडपीठाने फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालय सध्या पोस्कोअंतर्गत संमतीने किशोरवयीन संबंधांना वेगळे वागवले पाहिजे की नाही याची तपासणी करीत असल्याचे मान्य करताना न्यायालयाने मात्र या प्रकरणात ते विद्यमान कायद्याने बांधील असल्याचे सांगत विद्यमान कायद्यानुसार न्याय होईल, असेही स्पष्ट केले.