बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर येथील बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत मोठाच घोटाळा झाला. बनावट सोने तारण ठेवून घेत, बनावट ग्राहकाच्या नावाने तब्बल ११ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज शाखा व्यवस्थापकाने मंजूर केल्याची धक्कादायक बाब समोर अली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (१६ मार्च) या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

शाखा व्यवस्थापक सदाशिव मुरलीधर डोईफोडे (रा. संभाजी कॉलनी) व बनावट ग्राहक राजकुमार प्रकाश खंदारे (रा. गारखेडा परिसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बजाज फायनान्सचे अधिकारी कन्हैयालाल किशोरलाल अहिर (वय ३५) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. ते ऑडिट आणि शाखा निरीक्षणाचे काम पाहतात. गेल्या २ जानेवारी रोजी रिजनल मॅनेजर महेश वीर यांनी बजाजनगर शाखेला तातडीने भेट देण्याची सूचना अहिर यांना केली. अहिर त्याच दिवशी सायंकाळी शाखेत आले.

शाखा व्यवस्थापक सदाशिव मुरलीधर डोईफोडे चार- पाच दिवसांपासून शाखेत येत नसल्याचे आणि त्यांचा मोबाइलही बंद येत असल्याचे समोर आले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर शाखेचे ऑडिट सुरू करण्यात आले. ग्राहकांनी तारण ठेवलेले सोने स्ट्राँग रूममधून काढून तपासणी करण्यात आली. त्यावेळी एका पाउचमध्ये चक्क बनावट सोने आढळले. सदाशिव डोईफोडे याने २७ डिसेंबर २०२५ रोजी एका व्यक्तीकडून हे बनावट सोने स्वीकारले होते. त्याने स्वतःच पडताळणी करून ते खरे असल्याचे दाखवत, सहकारी कर्मचारी निकिता जैस्वाल यांची सहीसुद्धा घेतली. ते बनावट सोने स्ट्राँग रूममध्ये ठेवले. बनावट ग्राहक राजकुमार खंदारे याच्या नावाने ११ लाख २० हजार रुपयांचे गोल्ड लोन मंजूर केले.

गणेश कॉलनीत जुन्या लाकडी घराला आग
छत्रपती संभाजीनगर शहरातील गणेश कॉलनीत जुन्या लाकडी घराला मंगळवारी (१७ मार्च) दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागून घरातील दागिने, रोख रकमेसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिडको एन ९ व पद्‌मपुरा येथील एकूण ३ अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनीही घटनास्‍थळी भेट दिली. आगीतील नुकसानीचा निश्चित आकडा अद्याप समोर आलेला नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या, पैठण, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकरी आत्‍महत्‍येचा आकडा वाढतच असून, पैठण आणि कन्नड तालुक्यात आणखी दोन...
बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत ब्रँच मॅनेजरनेच केला घोटाळा!; वाळूज MIDC पोलिसांत गुन्हा दाखल
हिंदू नववर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात उद्या शोभायात्रा, खैरेंनी मंत्री शिरसाट, सावे, अंबादास दानवेंना केले ‘हे’ आवाहन...
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
उच्चशिक्षित तरुणांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये थाटला ड्रग्जचा कारखाना!; ड्रग्जविरोधी पथकाने केला पर्दाफाश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software