हंबरडा फोडून झाल्यावर आता उद्धव ठाकरे म्हणणार, दगाबाज रे... छत्रपती संभाजीनगरचा धावता दौरा, शेतकऱ्यांना भेटणार पण काही मिनिटेच..., निवडणूक तयारीवर चर्चेसाठी पदाधिकाऱ्यांना दिला १ तास!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ११ ऑक्‍टोबरला हंबरडा फोडल्यानंतर आता दगाबाज रे म्हणत ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान मराठवाड्यात शेतकरी संवाद दौरा काढणार आहेत. ५ नोव्हेंबरला सकाळी १० ला ते छत्रपती संभाजीनगरच्या नांदर (ता. पैठण) येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी अवघ्या काही मिनिटांत संवाद साधून पुढे बीड जिल्ह्यात रवाना होणार आहेत. अवघ्या काही मिनिटांच्या या दौऱ्यातून काय साध्य होणार, असा प्रश्न केला जात आहे. या दौऱ्यावर मंत्री संजय शिरसाट यांनीही टीका केली आहे.

मराठवाडा दौरा करून आल्यावर ८ नोव्हेंबरला सायंकाळी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय विश्रामगृहात छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्थानिक स्वराज्‍य संस्था निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करणार आहेत. नंतर सायंकाळी ७ वा. मुंबईला रवाना होणार आहेत. अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देणे सरकारला शक्य झाले नाही. त्यामुळे आश्वासने वांझोटी ठरली. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गतीने हालचाली करेल, अशी शक्यता होती. मात्र तसे न झाल्याने ग्रामीण भागात सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष आहे. हाच रोष पथ्यावर पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सध्या सुरू असल्याचे दिसून येते. ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान ठाकरे हे दगाबाज रे या संवाद दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद साधतील, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी रविवारी (२ नोव्हेंबर) येथे पत्रकार परिषद घेऊन दिली.

दानवे म्हणाले, की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने ३१ हजार कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली. दिवाळीपूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार होते. मात्र एक रुपयाही जमा झालेला नाही. ११ ऑक्‍टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला होता.  त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पॅकेजचे काय झाले हे पहायला दिवाळीनंतर पुन्हा येईल, असे म्हटले होते. त्यानुसार ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात कोठेही हारतुरे नसतील. मंचही उभारला जाणार नाही. ठाकरे हे वाड्या, चावडीवर शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दौऱ्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह सर्व खासदार, उपनेते, संपर्कप्रमुख, प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी होतील, असे दानवे म्हणाले. 

शिंदे गट दिल्या भाकरीचा, सांगितल्या कामाचा...
शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याबद्दल भाष्य केले आहे. त्यांना टोला लगावत दानवे म्हणाले, की शिंदे गट म्हणजे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे आहेत. शिंदे गट भाजपच्या मर्जीवरच चालणारा पक्ष आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्लीला जावे लागते. महायुतीचे सरकार दगाबाज असून, त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत दिली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. फलटण येथे डॉ. संपदा मुंडे प्रकरणात ठाकरे गट मोर्चा काढणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उपनेते सुभाष पाटील, राजू वैद्य, सुकन्या भोसले आदींची उपस्थिती होती.

मंत्री शिरसाट यांची टीका
उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे दोन मिनिटे शेतकरी आणि १० मिनिटे कार्यकर्ते असा असतो, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. राज ठाकरेंची एन्ट्री महाविकासात आघाडीत फूट टाकणारी आहे. कारण, ते काँग्रेससोबत कधीच जाणार नाहीत. देशात अनेक कन्फ्यूज नेते आहेत. त्यांच्यात आता राज ठाकरेंची भर पडली आहे. कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था मनसैनिकांची झाली आहे. राज ठाकरे हे वेळोवेळी राजकीय भूमिका बदलत असतात. उद्या तुमचे महाविकास आघाडीत काय स्थान असेल, असा सवालही शिरसाट यांनी राज ठाकरे यांना केला. आपण काल काय बोललो आणि आज काय बोलत आहोत यात ते कन्फ्यूज आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software